गोरगरीब नेत्ररूग्णांसाठी घरपोच तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:17 AM2018-11-17T00:17:12+5:302018-11-17T00:17:48+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नेत्ररोगाने त्रस्त असलेल्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. पोस्टकार्डने उपचाराची गरज असल्याचे सांगताच नेत्ररोगतज्ज्ञांची चमू थेट घरी पोहोचते.

Home Inspection for Poor Eyeglasses | गोरगरीब नेत्ररूग्णांसाठी घरपोच तपासणी

गोरगरीब नेत्ररूग्णांसाठी घरपोच तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मेडिकल’चे अभियान : २० हजार शस्त्रक्रियेचा संकल्प, आॅक्टोबरअखेर ३ हजार शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नेत्ररोगाने त्रस्त असलेल्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. पोस्टकार्डने उपचाराची गरज असल्याचे सांगताच नेत्ररोगतज्ज्ञांची चमू थेट घरी पोहोचते. अशा १०९ जणांची तपासणी करून रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नेत्ररोग विभागाने ग्रामीण भागातील गरीब रुग्णासाठी ‘घरपोच रुग्णसेवा अभियान’ सुरू केले आहे. वयोवृद्ध नेत्ररूग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचत नाही. जुजबी उपचार केल्यास त्यांना चांगली दृष्टी प्राप्त होऊ शकते. मात्र अनेक मर्यादा असल्याने उतारवयात दृष्टीहीन म्हणून दिवस काढावे लागतात. यातच त्यांची आबाळ होते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांनीच थेट रुग्णाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी केवळ नेत्ररुग्ण असलेल्यांनी पोस्टकार्डवरून आपली माहिती ‘मेडिकल’ नेत्ररोग विभाग प्रमुखाच्या नावे पाठविणे आवश्यक आहे. आतापर्यंत १०९ जणांनी पोस्टकार्ड केले. यामध्ये घाटंजी येथील ६६ रुग्ण, वाई (लिंगी) येथील ८ रुग्ण, चिकणी (आर्णी) येथील ३७ रुग्णांची घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या उपचाराची दिशा निश्चित करून काहींवर मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा आलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अभियानामुळे खेड्यापाड्यातील गरजू रुग्णांना घरपोच तपासणीचा लाभ मिळत आहे.
आता मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान
हा उपक्रम मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर पेंडके यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. आता मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानातंर्गत वर्षभरात २० हजार नेस्त्ररुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत ३ हजार १३८ यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या अभियानाचा व घरपोच सेवेचा नेत्ररूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. सुधीर पेंडके यांनी केले आहे.

Web Title: Home Inspection for Poor Eyeglasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.