वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:12+5:30

एकूण कोरोना रूग्णांपैकी ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता १५ झाली आहे. सोमवारी डी.बी.पथकातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून मंगळवारी वणी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, २४ कर्मचारी व १० होमगार्ड यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

Homeguard positive with Assistant Faujdar of Wani Police Station | वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह

वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देसंसर्ग वाढतोयं : शास्त्रीनगरातील महिला कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सोमवारी वणी पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकातील जमादाराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्याच्या संपर्कातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांपैकी एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच शास्त्रीनगरातील एका महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता वणीतील कोरोना रूग्णांची संख्या ६६ वर गेली आहे.
एकूण कोरोना रूग्णांपैकी ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता १५ झाली आहे. सोमवारी डी.बी.पथकातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून मंगळवारी वणी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, २४ कर्मचारी व १० होमगार्ड यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच शास्त्री नगरातील यापूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या तिघांनाही परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या तिघांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार केली जात आहे. सोमवारी ३९ जणांचे नमुने यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. यासोबतच ५३ जणांच्या रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती.

संपूर्ण डी.बी.पथकाला केले होम क्वॉरंटाईन
सोमवारी ज्या जमादाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कातील हायरिस्कमध्ये येणाºया डी.बी.पथकातील एका पोलीस अधिकाºयासह सहा कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले.

Web Title: Homeguard positive with Assistant Faujdar of Wani Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.