कळंब येथे आॅटोरिक्षाचालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:32 PM2018-10-06T23:32:20+5:302018-10-06T23:33:02+5:30

आॅटोरिक्षा चालक आणि पोलिसांचे संबंध कधीही मुधर नसतात. नागरिकांसोबतच पोलिसही आॅटो चालकांना तुसडेपणाची वागणूक देतात. मात्र येथील ठाणेदार नरेश रणधीर यांच्या पुढाकारातून पोलीस प्रशासनाने आॅटो चालकांना ठाण्यात बोलावून त्यांना खाकी युनिफॉर्म देऊन सन्मानित केले.

Honor of autorickshaw drivers at Kalamb | कळंब येथे आॅटोरिक्षाचालकांचा सन्मान

कळंब येथे आॅटोरिक्षाचालकांचा सन्मान

Next
ठळक मुद्देसर्वांना युनिफॉर्म भेट : पोलिसांची चालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : आॅटोरिक्षा चालक आणि पोलिसांचे संबंध कधीही मुधर नसतात. नागरिकांसोबतच पोलिसही आॅटो चालकांना तुसडेपणाची वागणूक देतात. मात्र येथील ठाणेदार नरेश रणधीर यांच्या पुढाकारातून पोलीस प्रशासनाने आॅटो चालकांना ठाण्यात बोलावून त्यांना खाकी युनिफॉर्म देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुनील पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सुशील सैंसारे, ठाणेदार नरेश रणधीर उपस्थित होते. कळंबच्या इतिहासात पहील्यांदा झालेल्या अशा कार्यक्रमामुळे आॅटो चालकही भारावून गेले. पोलीस आडवा झाला की, आॅटो चालकांची भंबेरी उडते. परंतु पोलिसांकडून मिळालेली कौतुकाची थाप त्यांच्यासाठी लाख मोलाची ठरते. यापूर्वी कळंबचे चालक कधीही युनिफॉर्म घालत नव्हते. मात्र आता रोज युनिफॉर्म घातला जातो. त्यामुळे एकप्रकारची शिस्त त्यांच्या दिसून येत आहे.
आॅटो चालक हा समाजाचा एक घटक आहे. प्रत्येक प्रवाशांना तो इच्छितस्थळी नेण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. आॅटो चालकांशी सलोख्याचे संबध असेल, तर अनेक गुन्ह्यात त्यांची पोलिसांना लाख मोलाची मदतही होते. यासोबतच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, म्हणून हा सत्कार करण्यात आल्याची प्रतिक्रिया ठाणेदार नरेश रणधीर यांनी दिली. या कौतुकाने सर्व चालक गहिरवले होते.

Web Title: Honor of autorickshaw drivers at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.