घोन्सा येथे शेतकऱ्यांचा सन्मान

By admin | Published: September 3, 2016 12:31 AM2016-09-03T00:31:49+5:302016-09-03T00:31:49+5:30

तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे गुरूवारी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Honor of farmers in Ghonsa | घोन्सा येथे शेतकऱ्यांचा सन्मान

घोन्सा येथे शेतकऱ्यांचा सन्मान

Next

वणी : तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे गुरूवारी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर बैलजोडी सजावट स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास कोटरंगे होते. उद्घाटन सरपंच निरूपमा पथाडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून बाबा गुंजेकार, सुनिल मत्ते, नामदेव टोंगे, भय्या गाते, खैबरअली सय्यद, महादेव धगडी, डॉ.जानराव ढोकणे, पोलीस पाटील सचिन उपरे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र खांडेकर, अनिता टोंगे, गणेश मांडवकर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम न्यू आदर्श व्यापारी गणेश मंडळातर्फे गुढीधारक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच अनिल साळवे यांनी केले. आभार पांडुरंग निकोडे यांनी मानले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे यांनी पोळ्याविषयी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट सजावट स्पर्धेत भय्याजी गाते, आत्राम, बाबा झाडे, भिमराव चेडे, सुधाकर राऊत यांच्या बैलजोडीला बक्षिसे मिळाली. एकरंगी बैलजोडी स्पर्धेत दिनेश जयस्वाल, मोहन उपरे, डॉ.जानराव ढोकणे, गोरखनाथ द्यारकर, सुनिल देऊळकर यांच्या बैलजोडीला बक्षिसे मिळाली. तसेच सुदृढ बैल स्पर्धेत रमेश जरिले, भाऊराव गुंजेकार, विलास मोहितकर, सुधाकर दाढे, दादा झाडे यांच्या बैलजोडीला बक्षिसे मिळाली.
या उत्सवाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कार्यालय, तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामविकास सहकारी संस्था, मच्छि व्यवसाय संस्था, संत गजानन महाराज श्रद्धाश्रम, ग्राम शिक्षण समिती, दक्षता समिती, वनहक्क समिती, हनुमान देवस्थान समिती, बळीराजा चेतना समिती, कुंभारखणी वेकोलि कामगार संघाने सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Honor of farmers in Ghonsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.