उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:29 PM2019-08-20T22:29:48+5:302019-08-20T22:31:00+5:30

आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.

Honor of Nandi Naik and stewards in Umarkhed | उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान

उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम : वसंतराव नाईक यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गो.सी. गावंडे महाविद्यालयात जिल्हा अखिल कुणबी समाजातर्फे हा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. यावेळी बंजारा समाजाचे आद्यगुरु पोहरादेवी येथील रामराव महाराज, अ‍ॅड. आशिष देशमुख, अ‍ॅड. हटकर उपस्थित होते. आजकालचे मुख्यमंत्री शासकीय पुजेच्या निमित्ताने विठ्ठलासमोर फोटोसेशन करतात. मात्र शेतकऱ्यांनाच आपले दैवत मानणाऱ्या वसंतराव नाईकांनी आपल्या ११ वर्षाच्या कारकीर्दीत विठ्ठलाच्या चरणी लिन होण्याऐवजी शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, असे प्रतिपादन अनंतकुमार पाटील यांनी केले. वसंतराव नाईकांनी ग्रामीण भागासाठी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तांड्यांचे नाईक व कारभारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर म्हणाले, तांड्यावरील नाईक आणि कारभारी यांच्या कामाची दखल म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रामराव महाराज यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात पाच नाईक व कारभारी यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित नाईक व कारभारी यांचा माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, शिवाजी सवनेकर, वनमालाताई राठोड, नितीन भुतडा, डॉ. विश्वनाथ विणकरे, अ‍ॅड. संतोष जैन, चितांगराव कदम, नारायणदास भट्टड, बाळू पाटील चंद्रे, डॉ. आनंदराव कदम, डॉ.या.मा. राऊत, संभाजी नरवाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अ‍ॅड. हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन प्रा.बी.यु. लाभशेटवार, चंद्रकांत ठेंगे यांनी केले. तर आभार सुधीर तंवर यांनी मानले.

Web Title: Honor of Nandi Naik and stewards in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.