वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 05:00 AM2022-04-04T05:00:00+5:302022-04-04T05:00:02+5:30

बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजीवांना अपघातातून वाचण्यास मदत होईल, हा या मागचा उद्देश आहे.

Hospital for the treatment of wildlife | वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय

वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याला संपन्न अशी वनसंपदा लाभलेली आहे. सर्वच भागात वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. अलीकडे तर वाघ, बिबट या सारखे दुर्मीळ प्राणीही सहज दिसत आहे. यावरून जंगलातील वन्यजीवांची संख्या वाढत असल्याचे दिसते. हे वन्यजीव कुठल्या कारणाने जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी व्यवस्थाच नव्हती. आता वन्यजीवांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारले जाणार आहे. 
विविध महामार्गांवर वाहनाच्या धडकेने वन्यजीव जखमी होतात. बऱ्याचदा तारांचे कुंपण, झुंजीत वन्यजीव जखमी होते. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाकडे स्वतंत्र यंत्रणाच नव्हती. जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून, या वन्यजीवांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवावे लागत होते. काही वर्षांपूर्वी अमोलकचंद महाविद्यालयाच्या मागील परिसरात वसंत उद्यानासमोर एक केंद्र उपलब्ध होते.  
त्या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांना देखभालीसाठी ठेवले जात होते, नंतर हे केंद्र बंद झाले. तेव्हापासून वनविभागाची मोठी अडचण झाली आहे. जखमी वन्यजीवाला वैद्यकीय उपचारासोबतच दैनंदिन देखरेख आवश्यक असते. उपचार केल्यानंतर थेट त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडणे धोक्याचे ठरते. त्यामुळेच यवतमाळ व वाशिम या दोन उपविभागांत वन्यजीवांसाठी रुग्णालय तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञांमार्फत जखमी प्राण्यांवर उपचार करण्यात येईल, तसेच त्यांना तंदुरुस्त होईपर्यंत निगराणीत ठेवले जाणार आहे. 
यवतमाळातील जाम रोडवरील ऑक्सिजन पार्क परिसरात हे उपचार केंद्र उभारता येते का, याची चाचपणी केली जात आहे. नंतर तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

 वन्यजीवांसाठी रुग्णवाहिका
- बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजीवांना अपघातातून वाचण्यास मदत होईल, हा या मागचा उद्देश आहे.

 

Web Title: Hospital for the treatment of wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.