वंचितांच्या मुलांसाठी वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:54 PM2018-03-05T22:54:38+5:302018-03-05T22:54:38+5:30

वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांसाठी पदरमोड करून सुरू असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. चक्क दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा करून येथे विद्यार्थ्यांसाठी पाच हॉलचे वसतिगृह बांधण्यात आले. नुकताच या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Hostels for the children of the children | वंचितांच्या मुलांसाठी वसतिगृह

वंचितांच्या मुलांसाठी वसतिगृह

Next
ठळक मुद्देप्रश्नचिन्ह आश्रमशाळा : मतिन भोसले यांना ‘वंदन सन्मान’ पुरस्कार

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांसाठी पदरमोड करून सुरू असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. चक्क दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा करून येथे विद्यार्थ्यांसाठी पाच हॉलचे वसतिगृह बांधण्यात आले. नुकताच या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
ही आश्रमशाळा चालविणारे मतिन भोसले यांना यवतमाळकरांनी यंदा ‘वंदन सन्मान’ हा पुरस्कार यवतमाळ येथील महेश भवनमध्ये प्रदान केला. या शाळेत ४५० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिकतात. त्यात २०० मुली आहेत. आनंद कसंबे यांनी चित्रीफितीच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह आश्रमशाळेवर प्रकाश टाकला. त्यातूनच शाळेसाठी यवतमाळातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्याच दिवशी दोन मेटॅडोर भरून किराणा शाळेला पाठविण्यात आला. तर नगदी मदतीतून वसतिगृह बांधून देण्यात आले.
डॉ. अविनाश सावजी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. विकास आमटे, डॉ. रवी कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, माजी आमदार अरुण अडसड यांच्या उपस्थितीत वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ येथील सपोर्ट ग्रूपचे प्रशांत परसोडकर, सुरेश राठी, डॉ. सुधा राठी, धनश्याम बागडी, कमल बागडी, दीपक बागडी, श्रीधर खंडलोया, जगदीश पोदुटवार, विजय देशपांडे, आचलिया, महिंद्रे, गुड्डू जयस्वाल, मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Hostels for the children of the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.