मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:51 PM2019-05-22T21:51:57+5:302019-05-22T21:52:30+5:30
मतमोजणी प्रक्रियेसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. सुरवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणी होईल. या फेºया पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅटमधील पेपर स्लिपची मोजणी होईल.
यवतमाळ : मतमोजणी प्रक्रियेसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. सुरवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणी होईल. या फेऱ्या पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅटमधील पेपर स्लिपची मोजणी होईल.
अशी आहे कर्मचारी संख्या
मतमोजणीसाठी पर्यवेक्षक १०७, सहायक १०२, सूक्ष्मनिरीक्षक १०८ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात टपाली मतपत्रिकांसाठी तीन टेबल, सेनादलातील मतपत्रिकांच्या स्कॅनिंगकरिता पाच टेबलची व्यवस्था केली आहे.
विधानसभानिहाय मोजणी फेऱ्या
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांच्या संख्येवरून मोजणी फेºयाचे नियोजन केले आहे. जेथे मतदान केंद्र कमी तेथील मोजणी लवकर आटोपणार आहे. वाशिम-२७, कारंजा- २६, राळेगाव - २५, दिग्रस - २८, पुसद - २४, यवतमाळ - ३० अशा मतमोजणी फेºया एकाचवेळी स्वतंत्र सहा हॉलमध्ये सुरू राहणार आहे.
स्वतंत्र मोजणी कक्षात १४ टेबल
विधानसभा निहाय मोजणी कक्ष आहेत. तेथे प्रत्येकी १४ टेबल ठेवण्यात आले असून त्यानुसार पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्मनिरीक्षक यांची नेमणूक केली आहे. एकूण ८४ टेबलवर मोजणी प्रक्रिया चालणार आहे. फेरीनिहाय मतांची घोषणा केली जाणार आहे.
व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लीपची पडताळणी
प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पाच मतदान केंद्र निवडून व्हीव्हीपॅटची मत पडताळणी होईल. मतदान केंद्र निवडण्यासाठी सोडत काढण्यात येईल. व्हीव्ही पॅटच्या पेपर स्लीप मोजून झाल्यानंतर ईव्हीएममध्ये संबंधित उमेदवारांना तितकीच मते मिळाली का किंवा यात तफावत आहे, याची पडताळणी करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे.