अशी बनवतात बनावट दारू; पुसदमधील आरोपीने करून दाखवले पोलिसांना प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:22 AM2021-03-23T11:22:55+5:302021-03-23T11:24:08+5:30
Yawatmal News जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सतिश बेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी माहुर फाटयावर छापा कारवाई केली. यावेळी शुभम मनोज जयस्वाल यांच्याजवळून बनावट दारू जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सतिश बेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी माहुर फाटयावर छापा कारवाई केली. यावेळी शुभम मनोज जयस्वाल यांच्याजवळून बनावट दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी विचारपूस केली असता तो स्वत: व त्याचा साथीदार चुलत भाऊ अमोल दिपक जयस्वाल दोन्ही दोघेही शिरपूर येथे बनावट दारू बनवून यवतमाळ जिल्हयात विक्री करीत असल्याचे सांगितले. त्याच्या जवळून इंपिरियल ब्ल्यू, मॅक डॉवेल्स, रॉयल स्टॅग या कंपनीची बनावट दारू, बनावट दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य स्पिरीट, कलरची प्लॅस्टीकची बॉटल, ड्रम मधुन स्पिरीट काढण्याची मशीन विविध कपनीच्या दारूचे बॉटलचे झाकण लेबल, मोटर सायकल कार असा एकुन १४ लाख २५ हजार ६१० रूपयाचा मुद्येमाल मिळाला.
सदर दोन्ही आरोपींविरुध्द विविध कलमांखाली महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. या आधी पुसद येथून बनावट दारू बनविणाऱ्यांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे . पुसद हे बनावट दारूसाठी प्रसिद्ध आहे .
यावेळी आरोपीने बनावट दारू कशी बनवितात आणि बाटली कोणत्या पद्धतीने सील करतात याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.