खाकीवर्दीतून पाझरला माणुसकीचा झरा

By admin | Published: May 19, 2016 02:14 AM2016-05-19T02:14:23+5:302016-05-19T02:14:23+5:30

पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रमात उमरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी..

A human flute from the khaki ward | खाकीवर्दीतून पाझरला माणुसकीचा झरा

खाकीवर्दीतून पाझरला माणुसकीचा झरा

Next

आदर्श : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
उमरखेड : पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रमात उमरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजारांची मदत देवून पोलीस विभागाने आपल्यातील माणुसकीचा प्रत्यय आणून दिला.
पोलीस हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उभा राहतो, खाकीवर्दीतील कठोर माणूस. सर्वसामान्यही त्यांच्यापासून चार हात दूर राहतो. परंतु खाकीवर्दीतही माणूस असतो, याचा प्रत्यय उमरखेड येथे नुकत्याच झालेल्या पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमात जाणवला. पोलीस कल्याण निधीसाठी उमरखेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार विजय खडसे, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, उमरखेड तहसीलदार भगवान कांबळे, ठाणेदार शिवाजी बचाटे, महागावचे ठाणेदार प्रकाश शेळके, बिटरगावचे ठाणेदार सुरज बोंडे, दराटीचे ठाणेदार सागर इंगोले, पोफाळी ठाणेदार सरदारसिंग ठाकूर उपस्थित होते.
मनोरंजनाच्या या कार्यक्रमात शोभा प्रकाश राठोड रा.चिल्ली, माया श्याम जाधव रा.घमापूर कुरळी, जनाबाई बालाजी ठाकरे रा.पिंपळदरी, लक्ष्मीबाई दत्ता भुसारे रा.अकोली, ज्योती संजय राठोड या पाच महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसातील संवेदनशील मन जागृत झाल्याचा प्रत्यय या ठिकाणी आला.
(शहर प्रतिनिधी)

उपस्थितांचे डोळे पाणावले
पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यावेळी महागाव तालुक्यातील बारभाई तांडा येथील ज्योती संजय राठोड ही महिला मदत स्वीकारण्यासाठी मंचावर आली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. यावेळी सर्व वातावरण भावूक झाले. मंचावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.

पोलीस हा समाजाचाच घटक आहे. शेतकरी जगला तर आपण सर्व जगू. यामुळेच पोलीस दलाने शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात दिला. उमरखेड येथे अशा उपक्रमाला प्रारंभ झाला. यापुढेही शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अखिलेशकुमार सिंग
जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: A human flute from the khaki ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.