निराधारचे पैसे आणताना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:08 AM2017-09-15T00:08:17+5:302017-09-15T00:08:35+5:30

निराधार वृद्धांची मोठी परवड असते. आधाराची काठी नसते, पण परिस्थितीची काठी वारंवार वार करते.

Humanitarian grounds bring unrealized money | निराधारचे पैसे आणताना माणुसकीचा आधार

निराधारचे पैसे आणताना माणुसकीचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देआर्णीतील प्रकार : बँकेत कोसळलेल्या वृद्धासाठी धावले युवक, बँक कर्मचाºयांकडून मानवतेचे दर्शन

हरिओम बघेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : निराधार वृद्धांची मोठी परवड असते. आधाराची काठी नसते, पण परिस्थितीची काठी वारंवार वार करते. पण एखादवेळी अचानक अनोळखी युवकही मदतीसाठी धावून येतात. तसाच प्रसंग गुरूवारी आर्णीत घडला. निराधारचे पैसे आणायला गेलेल्या कनिराम रत्ने यांना माणुसकीचा आधार मिळाला..!
उमरी पठार येथील कनिराम रत्ने यांना निराधार योजनेतून शासकीय मदत मिळते. मात्र, ही तुटपुंजी मदत बँकेतून कशी काढायची, याची पुरेशी माहिती अनेक वृद्धांकडे नसते, तशी कनिराम यांच्याकडेही नाही. त्यांची मदत वास्तविक जवळा येथील बँक शाखेतून येत असते. पण गुरुवारी ते जवळाऐवजी आर्णीच्या स्टेट बँक शाखेत पोहोचले. तेथे गेल्यावर कर्मचाºयांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. पण आता परत जाणे अशक्य झाले. कारण बाहेर पाऊस सुरू होता. आता काय करावे? शेवटी थकलेले कनिराम बँकेतच एका कोपºयात कोसळले. बराच वेळ पडून राहिल्यावर त्यांचा डोळाही लागला.
दुपारी ३.३० वाजता बँक कर्मचाºयांनी या आजोबांची वास्तपूस्त केली. काही बोलावे तर आजोबांना ऐकायलाच येत नव्हते. शेवटी पासबुक पाहून ते ‘श्रावणबाळ योजने’चे लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले. जवळाऐवजी आर्णीच्या बँकेत आल्याचेही कर्मचाºयांनी ओळखले. बँकेतील युवा कर्मचाºयांनी आजोबांना नाश्ता, पाणी दिले. गावाकडे जाण्यासाठी तिकिटचे पैसे दिले. आॅटोरिक्षा आणला आणि आजोबांना सुखरूप गावाकडे रवाना केले. नेहमी बँक ग्राहक आणि बँक कर्मचाºयांतील वादाचेच प्रसंग घडतात सर्वत्र दिसून येतात, पण गुरुवारी आर्णी येथील बँकेत ग्राहक आणि कर्मचाºयातील माणुसकीचे सुखद व दुर्मिळ चित्रही अनेकांना पाहायला मिळाले.

Web Title: Humanitarian grounds bring unrealized money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.