आर्णी पोलिसांनी दर्शविली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:19 PM2018-07-03T22:19:56+5:302018-07-03T22:20:50+5:30
एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो. मात्र वर्दीआड एक माणूसच असतो. याची प्रचिती येथे आली. पोलीस ठाण्याजवळील रहिवासी असलेला शेख सादीक शेख हाफीज हा ३० वर्षीय युवक कर्करोगाने पीडित आहे. त्याला गळ्याचा कर्करोग जडला आहे. मात्र परिस्थिती बेताचीच असल्याने त्याला उपचार करवून घेणे कठीण जात आहे.
पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर याना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शेख सादीकला मतदीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली. गोळा झालेली ही रक्कम ठाणेदार यशवंत बावीस्कर यांनी सादीकला सुपूर्द केली. यावेळी यशवंत बावीस्कर, सचिन भोंडे, गणेश हिरोलकर, दिनेश जाधव, अलकनंदा काळे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ही रक्कम सादीक शेखच्या पत्नीच्या सुपूर्द करण्यात आली.