जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

By admin | Published: February 28, 2015 02:07 AM2015-02-28T02:07:19+5:302015-02-28T02:07:19+5:30

जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच ..

Hundreds of development works will take place in the district | जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

Next

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच अभियानातील गावे विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे या अभियानात विविध शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. अभियानातील कामगिरीवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला चांगला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांर्तगत करावयाच्या कामांचा आढावा शुक्रवारी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
कृषी, पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण या जलयुक्त शिवार अभियानातील यंत्रणांसह अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विविध विकासाची कामे राबविणाऱ्या कार्यालयांचा अंतिम आराखडा पालकमंत्र्यांनी बैठकीत जाणून घेतला. तसेच अभियानातील गावे विकासाच्याबाबतीत परिपूर्ण करण्यासाठी जून अखेर अधिकाधिक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासन लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करीत असते. हे काम अधिक प्रभाविपणे होणे आवश्यक आहे. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देण्यासाठी अभियानांतर्गत सामूहिकपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
अभियानांतर्गत एकूण २७ विभाग जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये विकास कामे राबविणार असून या सर्व विभागांचे विकास आराखडे पूर्ण झाले आहे. सदर विभाग शेकडो कामे जून अखेरपर्यंत यातून करणार आहे. यामध्ये सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे असून कुणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अभियानात प्रामुख्याने पाणी टंचाई निवारणासोबतच वीज, पशुसंवर्धन, वनविभाग, महसूल, पोलीस अशा विविध विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक मदतीचे आवाहन
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माणच होवू नये यासाठी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी विविध कामे घेण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढविणे, लोकसहभागातून विविध जलस्त्रोतामधील गाळ काढणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, पाणी जीरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे व जनजागृती तसेच माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, सलग समतोल चर, गाळ काढणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी व लोकसहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणेमार्फत ही कामे होणार असून त्यासाठी नागरिकांची मदत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, सहकारी संस्था, अशासकीय संस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आर्थिक मदत, लोकसहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. आर्थिक मदत देवू इच्छिणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.

Web Title: Hundreds of development works will take place in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.