संततधार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:36 PM2018-07-10T23:36:13+5:302018-07-10T23:37:08+5:30

रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर अधून-मधून पाऊस कोसळत होता.

Hundreds of hectares of irrigated farm under irrigated rain | संततधार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

संततधार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

Next
ठळक मुद्देकळमना येथे घर कोसळले : उपविभागातील १६३ घरांना अंशत: नुकसान, महसूल विभागाचे सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर अधून-मधून पाऊस कोसळत होता. नदी-नाल्यांचा पूर ओसरला असला तरी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने वणी मारेगाव तालुक्यातील अंदाजे एक हजार शंभर हेक्टर शेतजमिन पाण्याखाली आली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर शेकडो हेक्टरवरील पिकांची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वणी तालुक्यातील घोन्सा येथे मंगळवारी सकाळी सुमारे तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे विदर्भा नदी पुन्हा कोपली. पावसापूर्वी या नदीचा पूर ओसरला होता. मात्र पावसानंतर घोन्साकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे पुलाची एक बाजूदेखील खचली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वणी तालुक्यातील कळमना बु. येथील मनोहर कृष्णा सलाम यांचे घर कोसळले. सुदैैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पावसामुळे वणी तालुक्यातील २४ गावांतील १३८ घरांना अंशत: क्षती पोहचली, तर मारेगाव तालुक्यातील तीन गावांतील २५ घरांची अंशत: पडझड झाली. कळमना बु.येथील मनोहर सलाम यांना शासनातर्फे पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य तातडीने देण्यात आले. गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ८२.२५ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली, तर मारेगाव तालुक्यात ५६.८ मि.मी.पाऊस कोसळला.
भर पावसातही महावितरणची यंत्रणा कामाला
सोमवारपासून वणीत सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे वणी परिसरातील महावितरणची यंत्रणा प्रभावीत झाली होती. त्यामुळे परिसरातील २२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पण, आपल्या जीवाची परवा न करता, भर पावसातच महावितरण कर्मचाºयांनी बॅकफिडींगची सोय केल्याने वरील २२ गावांना अखंडित वीज पुरवठा करण्यात आला आहे. पण , पुराच्या वाढलेल्या पातळीमुळे कुंभारकिन्ही जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने कुंभारकिन्ही, परसोडा, पिल्की वाढोणा या गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या गावाचा वीज पुरवठा खंडित आहे. निगुर्डा नदीला आलेल्या पुरामुळे या नदीला संमांतर जाणाºया शिंदोला ते पुनवट उपकेंद्राला जोडणाºया ३३ केव्ही वीज वाहिनीचे ४ खांब पडले. परिणामी पुनवट उपकेंद्र प्रभावित झाल्याने या उपकेंद्रावरून ज्या ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो अशा सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच शिरपूर वितरण केंद्राअंतर्गत उच्च दाबाचे ११ व लघू दाबाचे पाच पोल पडले आहेत. वणी ग्रामीणअंतर्गत ३३ केव्ही मोरणी वाहिनीचे ४ पोल झुकले आहेत. राजुरा वाहिनीचे सहा पोल वाकले आहेत, ११ केव्ही वाहिनीचे चार पोल तुटले आहेत. याशिवाय लघुदाबाचे १८ पोल तुटले आहेत. पांढरकवडा उपविभातील बोरी वितरण केंद्राअंतर्गत असलेले ११ केव्हीचे १० पोल पडलेले आहेत. झरी उपविभागातील १८ पोल तर मारेगाव परिसरातील पाच पोल पडले आहे. परिणामी परिसरातील २२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. पण, भर पावसात महावितरणच्या कर्मचाºयांनी लालगुडा उपकेंद्राच्या मदतीने वीज पुरवठा केला.
रस्ता गेला वाहून
संततधार पावसामुळे झरी तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. मुकुटबन-पाटण मार्गावर मुकुटबनपासून अर्धा किलोमिटर अंतरावर असलेल्या पुलावरील रस्ता वाहून गेला. रस्त्याच्या एका कडेला मोठे भगदाड पडले आहे.
पावसाचा जोर कायम
वणी उपविभागातील काही भागात अद्यापही पावसाचा जोर कायम असून त्यामुळे शेतीची कामे सध्या ठप्प पडली आहे. पावसामुळे शेतीकडे जाणारे रस्ते चिखलमय झाले असून त्यामुळे शेतकºयांना शेतात पोहचणे कठिण झाले आहे.
 

Web Title: Hundreds of hectares of irrigated farm under irrigated rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस