वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:33 PM2018-11-09T23:33:37+5:302018-11-09T23:34:12+5:30

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

Hundreds of plantation plants dissolved in the lake | वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

Next
ठळक मुद्देशिरपूर ग्रामपंचायतीचा प्रताप : रोप लागवडीचा उडविला बोजवारा, शासनाच्या उद्देशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. यापैकी एक हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी कनाके यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ५०० पेक्षा अधिक झाडांची लागवड झाली नसल्याची बाब एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितली. एक हजार रोपांची लागवड केल्यानंतर उर्वरित २०० पैकी १०० झाडे गावात वाटण्यात आली. त्यातील उरलेली १०० झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने ती फेकण्यात आली, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करून वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळ्या आकड्यांचा खेळ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रोपे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत ठेवण्यात आली होती. या रोपांची ग्रामपंचायतीने अखेरपर्यंत लागवडच केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ती सुकून गेली.
६ नोव्हेंबरला शिरपूर येथे पाणी विषयात शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबतचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ग्रामपंचायतीने ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ही रोपे एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन ती शिरपूरलगतच्या तलावात फेकून दिली. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
गेल्या काही वर्षात निसर्गाचा असमतोल निर्माण झाला. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताच वृक्ष लागवडीची मोठी मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार शिरपूर ग्रामपंचायतीलाही एक हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु मुळातच या विषयात अनास्था असलेल्या ग्रामपंचायतीने या योजनेचा पार बोजवारा उडवून टाकला. ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या रोपांपैकी किती झाडे जगलीत, असा प्रश्न विचारल असता, त्याचे उत्तरही सरपंच मिनाक्षी कनाके देऊ शकल्या नाहीत. माहिती घेऊन सांगते, असे ‘टीपीकल’ उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार झाडे ग्रामपंचायतीने लावली. उर्वरितपैकी काही झाडे गावात वाटण्यात आली, तर काही सुकून गेल्याने ती फेकण्यात आली. नेमकी किती झाडे सुकली, हे सांगता येणार नाही.
- मिनाक्षी कनाके, सरपंच, शिरपूर.

Web Title: Hundreds of plantation plants dissolved in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.