अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 09:08 PM2019-07-27T21:08:09+5:302019-07-27T21:08:53+5:30

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली.

Husband killed, wife injured in accident | अपघातात पती ठार, पत्नी जखमी

अपघातात पती ठार, पत्नी जखमी

Next
ठळक मुद्देकार झाडाला धडकली। वणीतील परिवारावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. अशोक वासेकर (५५) रा.वणी, असे या घटनेतील मृताचे नाव आहे. कल्पना अशोक वासेकर (५०) व दोघांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.
एम.एच.-२९-ए.आर.-३९६१ या क्रमांकाची कार वणी येथून राळेगाव मार्गे कळंबकडे येत होती. आमला गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या घटनेत कारमधील चार जण जखमी झाले. यात अशोक वासेकर, कल्पना वासेकर यांच्यासह चार जणांचा समावेश होता. त्यांना तत्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना यवतमाळ येथे हलविले. अशोक वासेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्पना वासेकर यांच्यासह तिघांवर उपचार केले जात आहे. या घटनेत कारचा चुराडा झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या मार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. उर्वरित जखमींची नावे कळू शकली नाही.

Web Title: Husband killed, wife injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.