या झोपडीत माझ्या...:
By admin | Published: October 17, 2015 12:35 AM2015-10-17T00:35:08+5:302015-10-17T00:36:59+5:30
‘जग मे जिसका नाम हैं जीवन... एक युद्ध हैं संग्राम हैं जीवन...’ दुर्गोत्सवात हमखास वाजणारे हे भक्तिगीत. सर्वसामान्य माणसाच्या मनातील दु:खांवर या ओळी हळूवार फुंकर घालतात.
Next
या झोपडीत माझ्या...: ‘जग मे जिसका नाम हैं जीवन... एक युद्ध हैं संग्राम हैं जीवन...’ दुर्गोत्सवात हमखास वाजणारे हे भक्तिगीत. सर्वसामान्य माणसाच्या मनातील दु:खांवर या ओळी हळूवार फुंकर घालतात. उत्सवांच्या काळात सर्वत्र होणारी झगमग पाहून वंचितांच्या जखमा ताज्या होतात. म्हणून यंदा प्रत्यक्ष देवीच गरिबांच्या झोपडीत विराजमान झाली अन् अख्ख्या शहरातील भाविकांचा ओढा या झोपडीकडे आकर्षित झालाय. हा मनोज्ञ देखावा चितारला आहे यवतमाळच्या आर्णी मार्गावरील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाने. ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या’ अशी अनुभूती येथे येते.