पर्यावरणासाठी हायड्रोजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किंमतीचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 05:00 AM2022-04-04T05:00:00+5:302022-04-04T05:00:06+5:30
हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर रेंज देणारी कार परवडणारी नाही. शहरात फिरण्यासाठी ती पर्याय ठरू शकते. सीएनजी कार परवडणारी आहे. पण सीएनजी स्टेशन नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर कसा करता येईल यावर प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर चालणारी कार कसा पर्याय ठरू शकते, हे दाखविले आहे. मात्र यामध्ये सध्या अनेक अडचणी आहेत. हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर रेंज देणारी कार परवडणारी नाही. शहरात फिरण्यासाठी ती पर्याय ठरू शकते. सीएनजी कार परवडणारी आहे. पण सीएनजी स्टेशन नाहीत.
इलेक्ट्रिक कार १६ लाखांपासून पुढे
इलेक्ट्रिक कारमध्ये आता चांगली इफिशियन्सी देणाऱ्या कंपन्या येऊ लागल्या आहे. मात्र त्याच्या चार्जिंगची समस्या कायम आहे. घरी या कार पूर्णपणे चार्ज होत नाही. पुढे रेंज कमी मिळते.
हायड्रोजन कार ५० लाखांपासून पुढे
हायड्रोजन कार भारतात तयार होत नाही. त्यांना विदेशातून आयात करावी लागते. कारच्या किमतीवरून आयात शुल्क निश्चित केले जाते. त्यामुळे या कार खूप महाग आहे. सध्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही.
इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रती किमी दीड रुपया
एका चार्जिंगमध्ये ३०० किलोमीटरची रेंज ही कार देते. चार्जिंगचा खर्च ४०० रुपये येतो. दीड रुपया प्रतिकिलोमीटर लागतात.
हायड्रोजन फ्यूएलचे दरच निश्चित झाले नाही
हायड्रोजन फ्यूएल किलोमध्ये लिटरमध्ये मिळणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे याचे दर निश्चित नसल्याने खर्चही सांगता येत नाही.
सीएनजी अवाक्यात, तेही महाग होतेय
पेट्रोलपेक्षा सीएनजी पर्यावरणपूरक आहे. एक किलो गॅसमध्ये ४० किलोमीटरची रेंज मिळते. नागपूरला ६०० रुपयात जाणे-येणे शक्य आहे. मात्र रेट्रोफिमेंट सेंटर आपल्याकडे नसल्याने ही वाहने वापरताना अडचणी आहे.
किमती आवाक्यात आल्या तरच खरेदी
पर्यावरणपूरक वाहने काळाची गरज आहे. मात्र वापरताना त्याच्या किमती, इंधन सहज उपलब्ध होणेही आवश्यक आहे.
- बाळासाहेब देशमुख
इलेक्ट्रिक कार चांगला पर्याय ठरू शकते. त्यासाठी चार्जिंग स्टेशन हवे. कारची इफिशियन्सी वाढविण्यात यावी. - मंगेश शिरभाते