मतांसाठी नव्हे मने जिंकायला आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:10 PM2019-08-29T22:10:18+5:302019-08-29T22:10:58+5:30

बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले.

I came to win hearts not for votes | मतांसाठी नव्हे मने जिंकायला आलो

मतांसाठी नव्हे मने जिंकायला आलो

Next
ठळक मुद्देआदित्य ठाकरे : दारव्हा येथे शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा, नागरिकांची मोठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : ही जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी काढलेली नाही. तर लोकसभेत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी विरोधात मतदान केले, त्यांची मने जिंकण्यासाठी मी आलोय, असे प्रतिपादन करतानाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनाच्या कर्जमुक्तीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशी कबुलीही दिली. दारव्हा येथे पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच ठिकठिकाणी उद्घाटन कार्यक्रम व स्वागत करण्यात आले. दारव्ह्याच्या मेळाव्या प्रसंगी शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद सदस्य मंचावर उपस्थित होते.
नागरिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ‘तुम्हाला कर्जमुक्ती मिळाली का?’ असा थेट सवाल केला. त्यावेळी नागरिकांमधून ‘नाही नाही’ असा सूर उमटला. त्यानंतर ठाकरे म्हणाले, ‘तुमच्यापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. शेवटच्या शेतकºयापर्यंत कर्जमुक्ती पोहोचवू. तुम्ही आम्हाला साथ द्या.’ यावेळी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पीकविम्याचा विषय काढून १० लाख शेतकºयांना शिवसेनेने विम्याचा लाभ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी नव्हेतर, लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याकरिता आहे. त्याचबरोबर ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांची मने जिंकण्याकरिता ही यात्रा काढल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या भागातील लोकांचा मोठा उत्साह माझ्यासाठी नव्हेतर राज्यमंत्री संजय राठोड व शिवसैनिकांच्या कामामुळे आहे. शिवसेनेच्या शाखा लोकांच्या कल्याणाकरिता ३६५ दिवस २४ तास उघड्या असतात. त्यामुळे भरभरून प्रेम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बचतगटांनी तयार केलेल्या दोन लाख कापडी पिशव्यांचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले. मेळाव्याला मतदारसंघातील महिला, पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.

मला नवा महाराष्ट्र घडवायचायं
आदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मला कुणाला मुख्यमंत्री नव्हेतर नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. जो दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असेल. शिवसेनेची ही भूमिका लोकांसमोर मांडण्याकरिता मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. यात्रेत मी किलोमीटर नाही तर लोकांचे आशीर्वाद, प्रेम मोजत आहे.

Web Title: I came to win hearts not for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.