‘त्या’ आठ सेकंदात मी लढायचे ठरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:42 PM2017-12-21T21:42:58+5:302017-12-21T21:43:23+5:30

खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता.

'That' I decided to fight in eight seconds | ‘त्या’ आठ सेकंदात मी लढायचे ठरविले

‘त्या’ आठ सेकंदात मी लढायचे ठरविले

Next
ठळक मुद्देआकाश चिकटे : भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक, अवघड आव्हानांचा केला सामना

नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. मी ठरविले की पेनॉल्टी मारणाºया खेळाडूप्रमाणे आपण हालचाल करायची नाही, तर आपल्या हालचालीप्रमाणे त्याला हालचाल करण्यासाठी बाध्य करायचे. माझी ही चाल यशस्वी ठरली. बेल्जीयम संघाच्या सहा पैकी चार खेळाडूंच्या पेनॉल्टी मी सेव्ह केल्या व भारत ३-२ अशा गोल फरकाने विजयी ठरला.
भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याने ‘लोकमत’शी बोलताना संघाच्या विजयातील गुपितं मांडली. भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धा आटोपून स्वगृही यवतमाळला आला असता त्याने संवाद साधला.
आकाश म्हणाला, आॅस्ट्रेलिया संघासोबत बरोबरीनंतर इंग्लंड संघाकडून झालेला पराभव व जर्मनीविरूद्ध मिळालेला एकमेव विजय यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जीयम संघासोबत विजय मिळविण्याचे अवघड आव्हान होते. बेल्जीयम या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पाहिला जात होता. आम्ही व्यूहरचना आखली, तूल्यबळ लढत दिली. शेवटी सामना पेनॉल्टी कॉर्नरवर गेला. गोलरक्षक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती आणि ती पार पाडली.
उपांत्य फेरीत अर्जेंटिना संघासोबतच्या सामन्यापूर्वी मूसळधार पाऊस झाल्याने कलिंगा स्टेडियममध्ये टर्फवर खूप पाणी जमा झाले होते. दोनही संघांच्या खेळाडूंची सामना खेळण्याची मानसिकता नव्हती. मात्र अर्जेंटीनाच्या कोचने कोणत्याही स्थितीत सामना खेळायचाच असा निर्णय घेतला. टर्फवर पाणी असतानाही आम्ही चांगली लढत दिली. परंतु संघाला पराभूत होण्यापासून वाचवू शकलो नाही. सामन्याच्या दिवशी पाऊस नसता तर निकाल वेगळा लागला असता, असेही आकाशने सांगितले. जानेवारीत न्यूझिलंड दौऱ्यासाठी संघ जाणार आहे. पुढील वर्षी आशिया कप, राष्ट्रकूल कॉमनवेल्थ गेम होत आहे. वर्ल्ड लीग स्पर्धेचा अनुभव या स्पर्धेत कामी येईल, असे आकाश म्हणाला.
आंतरराष्ट्रीय सामन्यात दुर्मिळ कामगिरी
४८ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आकाशने सडन डेथमध्ये सहा पैकी चार गोल अडविले. कोणत्याही देशाच्या गोलकिपरने आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी करणे फार दुर्मीळ आहे.

Web Title: 'That' I decided to fight in eight seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी