स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:19 PM2018-11-24T21:19:56+5:302018-11-24T21:21:49+5:30

विविध संघटनांच्यावतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसीय या पर्वात फुले-आंबेडकरांच्या विचारांची विविधांगी चर्चा होणार आहे.

Ideal banquet in memory | स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी

स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी

googlenewsNext
ठळक मुद्देविविध संघटनांचा पुढाकार : नऊ दिवस विविधांगी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध संघटनांच्यावतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसीय या पर्वात फुले-आंबेडकरांच्या विचारांची विविधांगी चर्चा होणार आहे. मान्यवर वक्ते, अभ्यासक हे विविध विषयांवर व्याख्यान देणार आहेत. क्रांतिज्योती सावित्रीआई फुले समता परिसर (आझाद मैदान) यवतमाळ येथे हे पर्व पार पडणार असल्याची माहिती येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली.
बुधवार, २८ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात ‘मातंग समाजाने स्वयंप्रकाशाची वाट धरावी’ या विषयावर डॉ. संतोष खंडारे यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता गुरु रविदास विचार मंचच्या संयोजनात ‘संविधान संस्कृतीची संकल्पना’ या विषयावर संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. अनंत राऊत हे विचार मांडणार आहेत. १९ रोजी आदिवासी मुक्ती दलाच्या संयोजनात ‘संविधानिक आदिवासीचे आरक्षण व आव्हाने’ या विषयावर राजेंद्र मरसकोल्हे हे विचार मांडतील. शुक्रवार, ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचच्या संयोजनात ‘फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा व राष्ट्रसंतांची राष्ट्रक्रांती’ या विषयावर रवी मानव यांचे व्याख्यान होणार आहे.
शनिवार, १ डिसेंबर रोजी जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात सायंकाळी ८ वाजता ‘देशाची सामाजिक व राजकीय परिस्थिती आणि आमची जबाबदारी’ या विषयावर डॉ. इकराम (अहमदनगर) हे विचार मांडणार आहेत. तत्पूर्वी सायंकाळी ६ वाजता गीते परिवर्तनाची, कुरान पठन होणार आहे. २ डिसेंबरला भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन व सत्यशोधक स्टडी सर्कलच्या संयोजनात सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि ६ वाजता ‘महात्मा फुले व सार्वजनिक सत्यधर्म’ या विषयावर अखिल भारतीय सत्यशोधक गोलमेज परिषद (वणी)चे अध्यक्ष दिलीप कोटरंगे, तर ‘ओबीसी की जातीगत जनजणना हमारे विकास का केंद्रबिंदू है’ या विषयावर हेमंत सैनी (हरियाणा) हे विचार मांडतील. विमुक्त धुमंतू - बारा बलुतेदार - ओबीसी अतिपिछडा सेवा संघ यांच्या संयोजनात ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संविधानाच्या तरतुदीनुसार भटके-विमुक्त, बारा बलुतेदार समाजाला आरक्षणाचे फायदे मिळेल काय’ या विषयावर प्रा. सुषमा अंधारे, सुशीला मोराळे यांचे व्याख्यान होणार आहे.
४ डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या संयोजनात सायंकाळी ६ वाजता संगीतसंध्या व सत्कार समारंभ होईल. ७ वाजता ‘संविधान व भारतीय लोकशाहीचे वर्तमान’ या विषयावर गंगाधर बनबरे हे विचार मांडतील. ५ रोजी स्मृती पर्व महिला समिती, वुमेन्स विंग्ज आॅफ आंबेडकराईट मुव्हमेंट यांच्या संयोजनात सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ६ वाजता ‘विद्यमान सरकार आणि पुरोगामी विचारवंतांची गळचेपी’ या विषयावर छायाताई खोब्रागडे या विचार मांडणार आहे. ६ डिसेंबरला आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यांच्या संयोजनात सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल. ‘घटनात्मक संस्थांवरील हल्ले : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर संजय जीवने यांचे व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता आदरांजलीपर गीतगायन होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर गोरे, आनंद गायकवाड, कवडुजी नगराळे, संजय बोरकर, संजय राठोड, बाबूसिंग कडेल, अभियंता दीपक नगराळे, संजय ढोले, जियाउद्दिन अल्ताफ रहेमान, एम.के. कोडापे, प्रा. दीपक वाघ, धनंजय गायकवाड, संजय बोरकर, शोभना कोटंबे, माया गोरे, कमल खंडारे, सुनीता काळे, सुनंदा वालदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Ideal banquet in memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.