जिल्ह्यात ‘आयडिया’चे मोबाईल नेटवर्क कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:19 PM2019-03-11T21:19:50+5:302019-03-11T21:20:05+5:30

सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या आयडिया कंपनीचे मोबाईल नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. एक मिनिटही कॉल चालत नाही, सातत्याने कॉलड्रॉप होतात, त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात मोबाईलच्या एकूण ग्राहकांपैकी ८० टक्के ग्राहक आता आयडियाचे आहेत.

Idea's mobile network collapsed in the district | जिल्ह्यात ‘आयडिया’चे मोबाईल नेटवर्क कोलमडले

जिल्ह्यात ‘आयडिया’चे मोबाईल नेटवर्क कोलमडले

Next
ठळक मुद्देकॉलड्रॉपची समस्या : ग्राहकांना भुर्दंड, एक मिनीटही कॉल चालत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या आयडिया कंपनीचे मोबाईल नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. एक मिनिटही कॉल चालत नाही, सातत्याने कॉलड्रॉप होतात, त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात मोबाईलच्या एकूण ग्राहकांपैकी ८० टक्के ग्राहक आता आयडियाचे आहेत. वोडाफोन आयडियामध्ये मर्ज झाल्याने ग्राहकसंख्या वाढली आहे. परंतु त्या तुलनेत टॉवर वाढविले गेलेले नाही. ग्राहक जास्त व टॉवर कमी असा असमतोल निर्माण झाल्याने नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. यवतमाळसारख्या जिल्हा मुख्यालयीच नेटवर्कची सर्वाधिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकतर कॉल लागत नाही, लागला तर मधातच कट होतो, त्यामुळे पूर्ण बोलणे होत नाही, समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होतो, दोन ग्राहक समोरासमोर उभे असूनही त्यांचा एकमेकांना फोन लागत नाही आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. सातत्याने केवळ आयडियाचे कॉलड्रॉप होत असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरावर नेटवर्कसाठी आयडियाचे टॉवर लावलेले आहेत त्यातील काहींनी ते आॅफ केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे ग्राहकांना घरात तर दूर रस्त्यावर आणि उंचावर असूनसुद्धा नेटवर्क मिळत नाही. नेटवर्कअभावी तंत्रज्ञानाच्या कामात खोळंबा होतो आहे.
सर्वीस सेंटरमध्ये ग्राहक तक्रारीसाठी गेल्यास तेथे योग्य न्याय मिळत नाही. किमान कुणी तक्रार ऐकूनही घेत नाही. आयडियाची सक्षम आॅथिरिटी येथे उपलब्ध नसल्याने तक्रार नेमकी कुणाकडे करावी, असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण होतो. आयडियाकडे या नेटवर्कबाबत चौकशी केली असता, आमच्याकडे तक्रारी येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. आयडियाच्या सूत्रानुसार मुळात नेटवर्कसाठी टॉवर उभारण्याची समस्या आहे. पाच वर्षांपूर्वी असलेल्या टॉवरच्या संख्येत आता दुप्पटीने वाढ झाली आहे. मात्र टॉवर उभारणीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कुणाच्या घरावर टॉवर उभारल्यास त्याच्या शेजारील मंडळी आक्षेप नोंदवितात. यासाठी मानवी जीवनावर ध्वनी लहरींचा होणारा परिणाम असे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येकालाच आपल्या घरावर मोबाईल टॉवर उभारून मासिक इन्कम सुरू करण्याची अपेक्षा असते. त्यातूनच कुणी टॉवर उभारल्यास त्याच्या तक्रारी करून ते बंद पाडण्याचा व स्वत: मिळविण्याचा प्रयत्न होतो. अशा जाचातूनच मग टॉवरधारक आपल्या घरावरील टॉवर स्विच आॅफ करतो. मात्र या वादात आयडियाचा सामान्य ग्राहक भरडला जात आहे. कॉलड्रॉपच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या कित्येक आयडिया ग्राहकांनी आता ही कंपनी सोडून आपला क्रमांक दुसऱ्या चांगले नेटवर्क असलेल्या मोबाईल कंपनीत कन्व्हर्ट करून घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे लगतच्या भविष्यात आयडियाची ग्राहक संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Idea's mobile network collapsed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.