शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

By admin | Published: November 29, 2015 03:12 AM2015-11-29T03:12:26+5:302015-11-29T03:12:26+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही.

Identify problems around farmers | शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

Next


घाटंजी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ‘मालामाल’ शेतकरीही कंगाल झाले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विजेच्या भारनियमनामुळे कापसासह सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. आता रबीचा पेरा करतानाही शेतकऱ्यांना भारनियमनाच्या अनिश्चिततेमुळे धोका वाटत आहे. याच धसक्यापायी अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करणेही टाळले आहे. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी शेतकरी खचून गेला आहे. हा तालुका कापूस उत्पादनात पूर्वीपासून अग्रेसर राहिला आहे. परंतु हमी भाव अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी तर हमी भावापेक्षाही कमी दराने शेतमाल घेण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा उतारा अपेक्षेपेक्षाही खूपच कमी येत असल्याने यापुढे कापसाला कोणता पर्याय शोधावा, या पेचात शेतकरी सापडले आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहो, अशी वक्तव्ये जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी शासन दरबारी जोरकसपणे बाजू मांडताना दिसत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Identify problems around farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.