पूल पूर्ण झाला, तरी वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:01 AM2018-05-16T00:01:16+5:302018-05-16T00:01:16+5:30
येथील हनुमान आखाडा चौकातील नाल्याचे काम गत अनेक महिन्यापासून सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला झाला नाही. यामुळे मंगळवारी यवतमाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील हनुमान आखाडा चौकातील नाल्याचे काम गत अनेक महिन्यापासून सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला झाला नाही. यामुळे मंगळवारी यवतमाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.
यवतमाळ शहरातील हनुमान आखाडा चौकातील नाल्यावरील पूल गत दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला. या पुलावरून जुन्या वसाहतीमधील वर्दळ सुरू असते. पुलाच्या कामामुळे या भागातील वाहतूक दूरवरून वळती करण्यात आली आहे. आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही तो वाहतुकीसाठी खुला झाला नाही. हा प्रकार उपद्रव क्षेत्रात मोडतो. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गावरून बाजारपेठ, कार्यालये आदी मार्ग जवळचा ठरतो. त्यामुळे मार्ग खुला करणे आवश्यक आहे. निवेदन सादर करताना अॅड. जयसिंग चव्हाण, अमित मिश्रा, सुनिल तिवारी, लकी जयस्वाल, राहुल फटिंग, विजय बुंदेला आदी उपस्थित होते.