त्वचेवर कोड असेल तर बिघडले कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 05:00 AM2022-07-03T05:00:00+5:302022-07-03T05:00:25+5:30
अनेकांच्या अंगावर पांढरे चट्टे दिसून येतात. काही नागरिकांना कोड असतो. या आजाराविषयी नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही. अशा लोकांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण होत नाही. तथापि नागरिकांमध्ये या आजाराविषयी मोठे गैरसमज आहे. त्यामुळे पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या नागरिकांविषयी काही ठिकाणी दुजाभाव केला जातो. वास्तविक हा आजार संसर्गजन्य नसल्याने अशा व्यक्तींपासून इतरांना कोणताही धोका नसतो.
हरीओम बघेल
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : पांढरे चट्टे किंवा कोड असणे हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र या विषयी लोकांमध्ये गैरसमज जास्त आहे. त्यामुळे अशा लोकांचा धीर खचतो.
अनेकांच्या अंगावर पांढरे चट्टे दिसून येतात. काही नागरिकांना कोड असतो. या आजाराविषयी नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही. अशा लोकांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण होत नाही. तथापि नागरिकांमध्ये या आजाराविषयी मोठे गैरसमज आहे. त्यामुळे पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या नागरिकांविषयी काही ठिकाणी दुजाभाव केला जातो. वास्तविक हा आजार संसर्गजन्य नसल्याने अशा व्यक्तींपासून इतरांना कोणताही धोका नसतो.
हा आजार काय?
या आजारात सुरुवातीला अंगावर पांढरे डाग येतात. तीव्र सूर्यकिरणात गेल्यास त्याचा रुग्णांना त्रास होतो. मात्र हा आजार अनुवांशिक आहे. आपली त्वचा उन्हात जाताना झाकून ठेवल्यास शरीरावर पांढरे डाग येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घाबरून न जाता अंग झाकून ठेवण्याची गरज आहे.
कशामुळे होतो?
शरीरावर पांढरे चट्टे येणे किंवा कोड होणे हा अनुवांशिक आजार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला हा आजार झाल्यास दुसऱ्याला तो होण्याची शक्यता असते. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही. एखाद्या कुटुंब प्रमुखाला हा आजार असल्यास अनुवांशिकतेनुसार तो मुलांना होण्याची जास्त शक्यता असते.
संसर्गजन्य नाही
पांढरे चट्टे किंवा कोड हा आजार संसर्गजन्य नाही. पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या रुग्णांमुळे तो फैलतही नाही. मात्र त्याविषयी गैरसमज जास्त आहे. नागरिकांनी या आजाराबाबत कोणतेही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही.
केवळ दोन टक्के लोकांना आजार
- तालुक्यात पांढरे चट्टे किंवा कोड असलेले अत्यंत कमी नागरिक आहे. त्यांना कोणताही त्रास नाही.
- तालुक्यातील केवळ दोन टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. मोजक्याच लोकांना त्याची लागण झाली आहे.
- हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे अशा रुग्णांपासून कोणताही धोका नसतो.