तलवारीने केक कापाल तर वाढदिवस होईल पोलिस कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:08 PM2024-09-28T18:08:41+5:302024-09-28T18:09:19+5:30
Yavatmal : वर्षभरात जिल्ह्यात पोलिसांनी केली ११० जणांवर कायदेशीर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपण किती दंबग आहोत, हे दाखविण्याच्या नादात अनेकांना वाढदिवस पोलिस कोठडीत साजरा करण्याची वेळ आली आहे. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणे, देशी कट्टा अथवा पिस्तूलमधून हवेत फायरिंग करणे, असे स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच असतो. काही हौसे तर स्वतःहून याचे व्हिडीओ- फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अशांवर भारतीय हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते. मागील आठ महिन्यात ११० जणांवर ही कारवाई झाली आहे.
कोणत्या महिन्यात किती गुन्हे
महिना गुन्हे अटक
जानेवारी ०३ ०८
फेब्रुवारी ०८ ०८
मार्च ०७ १०
एप्रिल ०८ १५
मे ०४ ०९
जून १७ १७
जुलै ०९ ०९
ऑगस्ट ११ ११
तरुणांकडून वाढदिवशी केली जातें हुल्लडबाजी
वाढदिवस विशेष स्मरणात राहावा, यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यापेक्षा हुल्लडबाजीवरच भर दिला जातो. आपण काही वेगळे आहोत हे भासविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यातूनच वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार किंवा इतर धारधार शस्त्र वापरले जाते. मित्रमंडळीही भाऊ, दादा म्हणून हवेत नेतात. पोलिसांचा बडगा आल्यानंतर मात्र कुणीच सोबत राहात नाही. अशा प्रकारे कारवाईच्या कचाट्यात वाढदिवस अडकतो.