ध्येय व जिद्द असेल तर यश हमखास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:06 PM2018-02-03T22:06:36+5:302018-02-03T22:08:20+5:30
विद्यार्थ्यांमध्ये ध्येय आणि जिद्द असली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले. आर्णी येथे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिवंगत रामदास दरणे स्मृती विदर्भस्तरीय आमदार चषक खो-खो-स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : विद्यार्थ्यांमध्ये ध्येय आणि जिद्द असली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले.
आर्णी येथे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिवंगत रामदास दरणे स्मृती विदर्भस्तरीय आमदार चषक खो-खो-स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा. राजू तोडसाम होती. मंचावर माजी राज्यमंत्री संजय देशमूख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती उपसभापती पपिता भाकरे, प्रियतमा बन्सोड, जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, विदर्भ खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सुहास पांडे, सचिव सुधीर निंबाळकर, डॉ.संजय भारती, महादेव सुपारे, बिपीन राठोड, विशाल देशमुख, अभिजित नंदुरकर, कल्पजित देवकर उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी म्हणून अशा स्पर्धांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करताना जिद्द, हिम्मत ठेवून यश प्राप्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव विलास टोणे यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी केले.