दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या ?

By admin | Published: February 10, 2017 01:50 AM2017-02-10T01:50:14+5:302017-02-10T01:50:14+5:30

साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है.

If you have a lot of trouble, tell me what? | दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या ?

दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या ?

Next

शहरात खेड्याचे जीणे : तेलगू वसाहत, नूर कॉलनी, नागठाणे ले-आऊटचे नागरिक हैराण
पुसद : साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है. हमारे एरिया में दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या बताऊ ? सब लोग सुनते है लेकिन उपाय करते नही, असे उद्विग्न शब्द आहे पुसद शहरातील तेलगू वसाहत, नूर कॉलनी आणि नागठाने ले-आऊटमधील नागरिकांचे.
महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद शहरातील या तीन वसाहतीत समस्यांचा डोंगर आहे. ग्रामीण भागापेक्षाही भयावह अवस्था आहे. म्हणालयाच शहर आहे, नागरिक मात्र समस्या घेऊनच दिवस काढत आहे. पुसद-यवतमाळ मार्गावर पूस नदीच्या तीरावर ही वसाहत आहे. तेलगू वसाहतीच्या प्रवेश द्वारावरच घाणीचे साम्राज्य दिसून आले. या भागातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा अनेक समस्या पुढे आल्या. तेलगू वसाहतीतील जागा मालकीची नाही. ही मंडळी भोगवटादार आहे. २०० घरांच्या या वस्तीत सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु समस्या सुटता सुटत नाही. आतापर्यंत या भागाचे नेतृत्व भाजपाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले. त्यामुळे गत १५ वर्षात या भागातील समस्याच सुटल्या नाहीत, असे येथील नागरिक सांगतात. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे या भागाच्या विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे.
या परिसराची मुख्य समस्या आहे ती तुंबलेल्या नाल्यांची. या भागातील पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच नाही. लगतच्या वसाहतीतील नाल्या उंच असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे तेलगू वसाहत, नूर कॉलनीत नाल्या तुंबल्या आहे. त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात अंतर्गत रस्तेच दिसत नाही. नाल्या नसल्याने खुल्या जागेत पाणी साचले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील रहिवासी महंमद हनिफ म. इस्माईल म्हणाले, नाली व डुकरांच्या बंदोबस्तासाठी वारंवार तक्रारी केल्या. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रिक्षा चालक सय्यद गफ्फार म्हणाले, नाल्या, रस्ते गत २० वर्षांपासून नाही. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीही घाणेरडे येते. अब्दूल कादीर शेख नूर म्हणाले, नागठाने ले-आऊटमधील नालीची तक्रार गत चार वर्षांपासून करीत आहे. परंतु कुणीही पुढे येत नाही.
ममता दिगांबर मेंढरे, अर्चना नरेंद्र मुनेश्वर, आबेराबी शेख मोहंमद, वंदना मारोती रेणके, कांचन अशोक डोंगरे, मो.युनुस अब्दूल रऊफ, शगुप्ताबी यांनी तर आपल्या मोहल्यातील समस्यांचा पाढाच वाचला. अगदी चिंचोळा असलेल्या रस्त्यामुळे जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात दोन-दोन फूट पाणी साचते. मुलांना शाळेत जाता येत नाही. लोकांच्या घरावरून वायर टाकून लाईन घ्यावी लागते. कुणी आजारी पडल्यास त्याला उचलूनच मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा या महिलांनी वाचला.
गत १५ वर्षांपासून समस्यांकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र आता या भागाच्या नगरसेविका दीपाली भगवान धुळे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या दीपाली महिला व बालकल्याण सभापती झाल्या आहेत.
या भागातील सदस्या सोडविण्यासाठी त्यांनी नियोजन केले असून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. घंटागाडी, रस्त्यांची साफसफाई करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. (कार्यालय चमू)

Web Title: If you have a lot of trouble, tell me what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.