पांढरकवडा तालुक्यातील पर्यटनस्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:40 AM2021-08-29T04:40:05+5:302021-08-29T04:40:05+5:30

वेगाने धावणाऱ्या डम्परवर कार्यवाही करा पांढरकवडा : तालुक्यातील रस्त्यावर होणारे अनेक अपघात हे वेगाने जाणाऱ्या डम्परने धडक दिल्याने होत ...

Ignored tourist places in Pandharkavada taluka | पांढरकवडा तालुक्यातील पर्यटनस्थळे दुर्लक्षित

पांढरकवडा तालुक्यातील पर्यटनस्थळे दुर्लक्षित

Next

वेगाने धावणाऱ्या डम्परवर कार्यवाही करा

पांढरकवडा : तालुक्यातील रस्त्यावर होणारे अनेक अपघात हे वेगाने जाणाऱ्या डम्परने धडक दिल्याने होत असून, वाळू, मुरुम, खडीने भरलेले हे डम्पर रात्री व दिवसा अति वेगाने धावत असतात. त्यामुळे अपघात होत आहे. हे ट्रकचालक मुजोरीने वाहन वेगत नेत असून, ते अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन, अशा डम्परवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खांबावर पथदिवे लावण्याची मागणी

पांढरकवडा : तालुक्यातील अनेक गावांत महावितरणच्या वतीने केवळ विद्युत खांब उभे करण्यात आले आहे. मात्र, त्यावर अद्यापही पथदिवे लावले नसल्याने याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन अशा खांबांवर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Ignored tourist places in Pandharkavada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.