चव्हाण यांना ‘आयजीं’चे प्रशस्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:03 PM2018-03-12T22:03:26+5:302018-03-12T22:03:26+5:30
महागाव येथील धाडसी दरोडाप्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महागाव येथील धाडसी दरोडाप्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
महागाव तालुक्यातील बेलदरी शिवारात पॉवर ग्रीड कार्पोरेशनच्या कामावरील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण यांनी या गुन्ह्यातील नऊ आरोपींना अटक केली. तसेच २३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या पथकात सहायक फौजदार साहेबराव राठोड, हरीश राऊत, सचिन हुमने यांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी संदीप चव्हाण यांना दहा हजार रुपये रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र घोषित केले. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना पाच हजार रुपये व इतर कर्मचाºयांंना दोन हजार ५०० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यवतमाळच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या सोहळ्यात सदर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.