दारव्हा तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:20 PM2018-01-12T22:20:19+5:302018-01-12T22:20:34+5:30
तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रात्रीच्या वेळेस ही रेती शहरात आणली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेतीचा साठा करणे सुरू असून तस्करांचे रॅकेटच यात गुंतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रात्रीच्या वेळेस ही रेती शहरात आणली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेतीचा साठा करणे सुरू असून तस्करांचे रॅकेटच यात गुंतले आहे. अवैध रेतीचा ट्रक शासकीय दंड आकारण्याऐवजी परस्पर २० हजारात डिलिंग करून सोडण्यात आला. त्यामुळे आता कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमानुसार सायंकाळी ६ नंतर रेतीची वाहतूक करता येत नाही. तरीसुद्धा नियम डावलून रात्रीच रेतीची वाहने रिकामी केली जातात. दिवसात दोन ते तीन फेºया मारून पैसे कमविण्याचा हव्यास आहे. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे रेती माफियांच्या या उद्योगात प्रशासनही सामिल आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. शहरासह ग्रामीण भागात बांधकामामध्ये वाढ झाल्याने रेतीची मागणी वाढली आहे. रेतीच्या व्यवसायात तेजी असल्याने ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर यासारखी वाहने जिल्ह्यातील रेती घाटावरून येथे रेती आणत आहे. दर दिवशी एक ट्रीप मारली जाऊ शकते, मात्र अधिक नफा कमाविण्यासाठी रेतीचा साठा केली जात आहे. त्याकरिता रात्रीच्यावेळेस विना रॉयल्टी रेती शहरात आणली जात आहे. या रेती तस्करीला पोलीस, महसूल प्रशासन व परिवहन विभागाकडून मूक संमती असल्याचे दिसून येते. केवळ रात्रगस्तीत जागेवरच सेटींग केले जाते.