यवतमाळ जिल्ह्यात मुलींचीच बाजी, निकाल ९४.५७ टक्के
By विलास गावंडे | Published: May 27, 2024 02:19 PM2024-05-27T14:19:13+5:302024-05-27T14:20:00+5:30
Yavatmal : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल साेमवारी, दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या निकाल ९४.५७ टक्के आहे. या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, त्यांची टक्केवारी ९६.३८ इतकी आहे. तर, मुलांची उत्तीर्ण हाेण्याची टक्केवारी ९२.९४ आहे.
अमरावती विभागाचा निकाल ९५.०७ टक्के लागला असून, यंदा विभागात यवतमाळ जिल्हा चाैथ्या क्रमांकावर राहिला. दहावीच्या परीक्षेसाठी ३८ हजार ५८१ विद्यार्थ्यांची नाेंदणी करण्यात आली हाेती. त्यापैकी ३८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रावीण्य श्रेणीत ११ हजार १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १३ हजार ३८१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ८ हजार ८४२ तर, २ हजार ७२८ विद्यार्थी केवळ पास झाले आहेत. असे एकूण ३६ हजार १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. १८ हजार ७१८ मुले तर, १७ हजार ४२१ मुलींची उत्तीर्ण हाेण्याची आकडेवारी आहे. तालुकानिहाय निकाल असा आहे, यवतमाळ - ९५.७८ टक्के, नेर - ९६.१०, दारव्हा - ९३.७५, दिग्रस - ९३.१२, आर्णी - ९४.७८, पुसद - ९४.८५, उमरखेड - ९६.१७, महागाव - ९७.६६, बाभूळगाव - ९४.२९, कळंब - ९२.७१, राळेगाव - ९४.८२, मारेगाव - ८७.९५, पांढरकवडा - ९२.७०, झरीजामणी - ९४.०७, वणी - ९२.१७, घाटंजी - ९४.३८.