उमरखेडमध्ये स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन

By admin | Published: March 16, 2017 01:02 AM2017-03-16T01:02:28+5:302017-03-16T01:02:28+5:30

तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग संस्थेत उभारण्यात आलेल्या स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने

Inaugurating the automatic cotton processing project in Umarkhed | उमरखेडमध्ये स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन

उमरखेडमध्ये स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन

Next

उमरखेड : तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग संस्थेत उभारण्यात आलेल्या स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी होते.
प्रमुख पाहुणे आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजय खडसे, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नंदकिशोर अग्रवाल, उत्तराव शिंदे, नारायणदास भट्टड उपस्थित होते. शेतकरी विकासाला गती देण्यासाठी कापूस प्रक्रिया उद्योग त्यासह पूरक उद्योग सुरू करण्यासाठी नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेतला. संस्थेच्या भागभांडवल बळावर एक कोटी रुपयाची गुंतवणूक करून कापूस प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणा सुरू करण्यात आली. या उद्योगामुळे गुणवत्ताधारक कापूस पिलाई गाठी तयार होणार असून बाजारपेठेत त्याला मागणी वाढेल, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंतराव कदम यांनी सांगितले.
यावेळी भीमराव चंद्रवंशी, महेश काळेश्वरकर, बाळासाहेब नाईक, सतीश वानखेडे, बाळासाहेब चंद्रे, किसन वानखेडे, दिलीप नरवाडे, प्रेमराव वानखेडे, इनायतुल्ला जनाब, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, बळवंत नाईक, अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, सहकार अधिकारी भागानगरे, विलास मोरे, खविसंचे उपाध्यक्ष नारायण मोरे, आत्माराम शिंदे, सविता कदम, छाया धूळध्वज, रक्षा माने, सभापती प्रयाग कोत्तेवार, संगीता वानखेडे, बाळासाहेब आगलावे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी संस्था उपाध्यक्ष डॉ.भगवान देवसरकर, मानद सचिव हरिभाऊ दिल्लेवार, दीपक जोशी, सर्व संचालकांनी परिश्रम घेतले. संचालन वसंत चव्हाण यांनी, तर आभार बापुराव धुळे यांनी मानले.
(शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Inaugurating the automatic cotton processing project in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.