‘बिरसा पर्व’चे आदिवासी संस्कृतीद्वारे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:11+5:30
आदिवासी संस्कृतीचा ध्वज फडकवून आणि गोंडी गोगो पूजा करून येथील समता मैदानात आयोजित ‘बिरसा पर्व-२०१९’चे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्ग परिवहन महामंडळातील चालक महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी संस्कृतीचा ध्वज फडकवून आणि गोंडी गोगो पूजा करून येथील समता मैदानात आयोजित ‘बिरसा पर्व-२०१९’चे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्ग परिवहन महामंडळातील चालक महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
बिरसा पर्व उत्सव समितीच्यावतीने २८ व २९ डिसेंबर रोजी ‘बिरसा पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन अशोकभाई चौधरी (गुजरात) यांच्या हस्ते झाले. माजी आदिवासी विकासमंत्री आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते संतोष ढवळे, नगरसेवक जावेद अन्सारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद धुर्वे, अनुसूचित जाती जमाती परिसंघाचे जिल्हाध्यक्ष एम.के. कोडापे आदी उपस्थित होते.
सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजाने तयार राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अशोकभाई चौधरी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. यावेळी बाबाराव मडावी, विठोबाजी मसराम, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. विनोद डवले, राजेश ढगे, कैलास कोळवते यांचा सत्कार करण्यात आला.
राजू चांदेकर यांनी प्रास्ताविकातून समाजाच्या समस्या मांडल्या. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मीनाक्षीताई वट्टी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या विदर्भ महासचिव सुवर्णा वरखडे लाभल्या होत्या. अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनीषा तिरणकार, सुनंदाताई मडावी, सुनीता काळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किशोर उईके, कृष्णा पुसनाके, सुरेश मडावी, अजय उईके, पवन आत्राम, दिलीप शेडमाके, राजू केराम, अभिमन्यू धुर्वे आदी पुढाकार घेत आहेत.
आजचे कार्यक्रम
बिरसा पर्वात रविवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले सत्र सुरू होईल. यावेळी ‘आदिवासींची अवस्था विकासाची, चिंतन व दिशा’ या विषयावर मार्गदर्शन होईल.
दुपारी ३ वाजता दुसऱ्या सत्रात ‘२०२१ च्या जनगणनेत आदिवासी समुदायांनी धर्माच्या रकान्यात काय नोंदवावे?’ या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.