पुसद येथे राज्यातील पहिल्या बार टायपिस्ट संगणक कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:20 PM2018-01-31T22:20:10+5:302018-01-31T22:20:29+5:30

येथील न्यायालयात स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.बी.गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Typist Computer Class for the first time in the state of Pusad | पुसद येथे राज्यातील पहिल्या बार टायपिस्ट संगणक कक्षाचे उद्घाटन

पुसद येथे राज्यातील पहिल्या बार टायपिस्ट संगणक कक्षाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयात स्वतंत्र संगणक कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील न्यायालयात स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.बी.गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए.एम. अंबाळकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. आशिष देशमुख, पुसद वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जावेद वर्षाणी, सचिव अ‍ॅड. अमोल आसोले उपस्थित होते. अनेक वर्षांपासून पुसद न्यायालयातील कामकाज टायपिंग मशीनवरच होत होते. टायपिंग मशीन ऐवजी संगणक बसविण्याची व स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. कैलास राठोड यांनी पाठविला होता. त्यानंतर त्याचा पाठपुरावा माजी अध्यक्ष अ‍ॅड. बालाजी कपाटे, अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी केला. पुसदला अद्ययावत संगणक कक्ष उभारण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार २६ जानेवारी रोजी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता येथील टायपिंग मशीनची टिकटिक थांबली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुसद हे पहिले बार टायपिस्ट संगणक कक्ष निर्माण करणारे न्यायालय ठरले.
प्रास्ताविक सतीश व्यवहारे यांनी केले. तर आभार राजेंद्र कोडगीलवार यांनी मानले. यावेळी रुद्र मनोज घाडगे, मयंक कैलास राठोड, शास्वत सुनील नरवाडे यांचा सत्कार केला.

Web Title: Inauguration of Typist Computer Class for the first time in the state of Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.