मतदान प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:15 PM2019-01-18T22:15:14+5:302019-01-18T22:16:13+5:30
लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मतदार जागरुकता मंचच्या माध्यमातून नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनातर्फे मतदान पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात घरोघरी मतदारांच्या भेटी, नवमतदारांना ओळखपत्र वाटप, दिव्यांग मतदारांची नोंदणी, महिला बचत गट व माविमच्या माध्यमातून महिला मतदारांची नोंदणी आदींचा समावेश आहे, असे यावेळी सांगण्यात आले. सर्व यंत्रणेसह जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांपर्यंत पोहचून मतदान प्रक्रियेत इतरांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.