गुन्हेसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:23 PM2018-11-22T21:23:19+5:302018-11-22T21:24:12+5:30
सत्र व प्रथमश्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यात गुन्हे शाबितीचे व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या स्तरावरून प्रयत्न व्हावे, त्यासाठी तपासात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सत्र व प्रथमश्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यात गुन्हे शाबितीचे व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या स्तरावरून प्रयत्न व्हावे, त्यासाठी तपासात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले आहेत.
एसपींची मासिक गुन्हे आढावा बैठक गुरुवारी येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. ३ ते ४ डिसेंबर दरम्यान राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येणार आहे. यावेळी ते गुन्हेगारीचा आढावा घेणार आहे. ठाणेदारांच्या क्राईम मिटींगवर मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य दौºयाचे सावट दिसून आले. न्यायालयांमध्ये दाखल होणाºया खटल्यात गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आग्रही असतात. तोच धागा पकडून एसपींनी सर्व ठाणेदारांना गुन्ह्यांचा तपास काटेकोर करण्याचे निर्देश दिले. आजच्या घडीला जिल्ह्यात न्यायालयीन खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढले असले तरी ते समाधानकारक नाही. हे प्रमाण किमान ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यासाठी सदोष दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना ठाणेदारांना करण्यात आल्या. पोलीस महानिरीक्षकांचे वार्षिक निरीक्षण सुरू होणार आहे. या अनुषंगाने प्रलंबित गुन्हे वेगाने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता रेकॉर्डवरील संबंधित गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याच्या व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. निवडणूक काळात गोंधळ घालणाºया, मतदान केंद्रांवर वादग्रस्त वर्तवणूक असलेल्या व कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले आहे. तडीपारीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अलिकडेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. मोक्का, एमपीडीए वाढवा अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.
नवी इमारत तयार
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील विस्तारीत इमारतीचे उद्घाटनही करण्याचे एसपींचे नियोजन आहे.