सिमेंट घोटळ्यातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:53+5:302021-07-03T04:25:53+5:30

२०१८ मध्ये हैदराबाद येथील एका सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक पंकज पाटणी यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात सिमेंट घोटाळ्याची तक्रार दिली होती. ...

Increase in police custody of accused in cement scam | सिमेंट घोटळ्यातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

सिमेंट घोटळ्यातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

googlenewsNext

२०१८ मध्ये हैदराबाद येथील एका सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक पंकज पाटणी यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात सिमेंट घोटाळ्याची तक्रार दिली होती. यात विक्रमसिंह बिसेन रा. नांदेड व संजय रामेश्वर भंडारी रा. पुसद हे मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी डीलरला सिमेंटची विक्री न करता बोगस बिल कंपनीकडे सादर करून ९७ लाखांची फसवणूक केली. या दोघांविरुद्ध २०१८ मध्ये वसंतनगर पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन वर्षांपासून आरोपी पोलिसांच्या मोकाट होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या आदेशानुसार या घोटाळ्याचे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. नंतर शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी आरोपी संजय रामेश्वर भंडारी (५५) याला मोतीनगरातील राहत्या घरून अटक केली. त्याला १ जुलैपर्यंत पीसीआर मिळाला होता. त्यानंतर आरोपीचा पीसीआर पाच दिवसांनी वाढविण्यात आला. आरोपी कापड व्यापारी, पेट्रोल पंप, बिल्डरच्या व्यवसायात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Increase in police custody of accused in cement scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.