राष्ट्रीय महामार्गावर वाढले अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:44 AM2021-08-23T04:44:20+5:302021-08-23T04:44:20+5:30
पांढरकवडा शहरात पार्किंगचा अभाव पांढरकवडा : शहरात पार्किंगची काही ठिकाणी सोय नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. ...
पांढरकवडा शहरात पार्किंगचा अभाव
पांढरकवडा : शहरात पार्किंगची काही ठिकाणी सोय नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीवर होतो. त्यामुळे शहरात अशा ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर काढले आहे. त्यामुळे दुकानात जाणारे नागरिकही दुकानासमोरच वाहने उभी ठेवत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
बँक एटीएमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
पांढरकवडा : शहरात विविध ठिकाणी विविध बँकेचे एटीएम आहेत; मात्र एटीएमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अनेक एटीएममध्ये कागदाचे तुकडे पडलेले असतात. ते नियमित उचलले जात नाही. त्यामुळे बँकांनी एटीएमच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुनर्नियुक्तीसाठी कामगाराचे उपोषण
वणी : शिंदोला येथील एसीसी कंपनीतील कर्मचारी संतोष दादाजी पेंदोर यांना तेथील अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे कामावरून काढले. त्यामुळे पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी संबंधितांकडे केली होती. मात्र मागणी मान्य न झाल्याने २३ ऑगस्टपासून येथील एसडीओ कार्यालयापुढे ते बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यांना एसीसी कंपनीत पूर्ववत सामील करून घ्यावे, तसेच १४ ऑगस्ट २०१९ पासूनचा रखडलेला पगार देण्यात यावा, तसेच केंद्र शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संतोष पेंदोर हे उपोषणाला बसणार आहेत.