शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:21 PM2019-03-11T21:21:57+5:302019-03-11T21:22:24+5:30

दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.

Increasing stress among farmers, depression | शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

Next
ठळक मुद्देटाटा ट्रस्टचा अहवाल : संकटातून बाहेर काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

काशीनाथ लाहोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.
शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशातच नव्हे तर जगात चर्चेत आहेत. या आत्महत्या केंद्र व राज्यातील सरकार आणि प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा देशातील एकमेव प्रकल्प टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ६४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. त्यावर विविध उपाययोजनांसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने आता राळेगाव व केळापूर या आणखी दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने शासनाला दिला आहे. या माध्यमातून चार तालुक्यातील ४५० गावांमध्ये टाटा ट्रस्ट पोहोचणार आहे.
गेली तीन वर्ष टाटा ट्रस्टच्या चमूने घाटंजी व यवतमाळ तालुक्यात शेतकरी आत्महत्यांवर बरेच काम केले. त्यातूनच अनेक गंभीरबाबी पुढे आल्या. नैराश्य व ताण-तणावाने ग्रस्त शेतकºयांना या बिकट प्रसंगी धीर देण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुळापासून सखोल व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याची आवश्कता टाटा ट्रस्टने नोंदविली आहे. शेतकºयांसाठी विदर्भ मनोसामाजिक समूपदेशन व काळजी कार्यक्रम राबविला गेला. बैठक, चर्चा, मेळावे, गावांना नियमित भेटी, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, उपचार, लोकचळवळ या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या गेल्या. आता त्यांच्या पुनर्वसनावर जोर दिला जाणार आहे.
२५ हजार नागरिकांची चाचणी
गेल्या तीन वर्षात टाटा ट्रस्टने ६४ गावातील २५ हजार नागरिकांची चाचणी केली. त्यांच्यातील तणावाचे स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले. १३५० नागरिकांची मनोरुग्ण म्हणून नोंद केली गेली असून उपचार करण्यात येत आहे. यातील ६५० नागरिकांचे नैराश्य दूर करण्यात यश आल्याचे टाटा ट्रस्टने सांगितले. त्यातील २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला. १२० नागरिकांना केम प्रकल्पातून शेळ्या खरेदीसाठी अनुदान दिले गेले. त्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.

शेतकरी व त्यांच्या कुटुंबांचे नैराश्य दूर करून त्यांना मानसिक आधार देण्यात, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, उपचार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. आता त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. हाच प्रकल्प आणखी दोन तालुक्यांमध्ये राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
- डॉ. प्रफुल्ल कापसे
प्रकल्प संचालक, टाटा ट्रस्ट

Web Title: Increasing stress among farmers, depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.