‘तो’ महिला पोलिसांशी करायचा अश्लील संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 09:53 AM2023-05-07T09:53:17+5:302023-05-07T09:53:50+5:30

यवतमाळ पोलिसांनी केली अटक : नियंत्रण कक्षातून मिळविले क्रमांक

Indecent conversation with female police in yavatmal | ‘तो’ महिला पोलिसांशी करायचा अश्लील संभाषण

‘तो’ महिला पोलिसांशी करायचा अश्लील संभाषण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाइल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीतून धक्कादायक कारनामा पुढे आला आहे. हा युवक महिला पोलिसांनाच टार्गेट करीत होता. काहींनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली तर काहींनी दुर्लक्ष केले. यवतमाळातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी अश्लील संभाषण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होता. यातच त्याला ताब्यात घेण्यात आले.

मारोती सुरेश लुंगसे (२९, रा. लहू, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून असल्याची बतावणी मारोती करीत होता. महिला पोलिस हे मारोतीचे सर्वांत मोठे टार्गेट होते. यासोबतच त्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. रेल्वेत सापडलेल्या मोबाइलचा वापर तो करीत होता.

मनमाड येथे एका मुलीकडे तो राहायला गेला. पोरगा चांगला आहे, त्याला जावई म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही, असा समज त्या मुलीच्या कुटुंबीयांचा झाला. त्यामुळे सलग चार महिने हा मुलीकडे मुक्कामी होता. मुलीच्या भावाने मारोतीची गावात जाऊन चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तो रिकामटेकडा असल्याची माहिती मिळाली.

असा करायचा पोलिस महिलांशी संपर्क

महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे सोशल मीडियावर स्टेट्स पाहून त्यांचे नाव व नियुक्तीचे ठिकाण लिहून घेत होता. नंतर त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात फोन करून संपर्क क्रमांक मिळवित होता. मोबाइलवर संपर्क करून महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अश्लील संभाषण करायचा. कुणाला प्रेमाची मागणी घालायचा.

Web Title: Indecent conversation with female police in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.