भारत संचारची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:31 PM2019-01-22T21:31:56+5:302019-01-22T21:32:16+5:30

वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते.

India broke the power of communication | भारत संचारची वीज तोडली

भारत संचारची वीज तोडली

Next
ठळक मुद्देतीन लाख थकीत : इंटरनेट बंदने नेर शहरातील बँकांचे शटर पडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते.
बीएसएनएलकडे विद्युत कंपनीचे आॅक्टोबर ते डिसेंबर, असे तीन महिन्याचे बील थकीत ंआहे. दोन लाख ८८ हजार ९०० रुपये एवढी रक्कम भरण्यासाठी विद्युत कंपनीने बीएसएनएलला सूचित केले. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर शनिवारी वीज तोडण्यात आली. तीन दिवस लोटूनही संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले.
वीज बंद असल्याने भारत संचारची इंटरनेट सेवा ही कोलमडली. बँका, सायबर कॅफे आदी ठिकाणचे व्यवहार थांबले गेले. मंगळवारी येथील बहुतांश बँकांनी आपले व्यवहार थांबविले होते. भारत संचारची येथे असलेली प्रशस्त इमारत शोभेची वास्तू ठरली आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहे. त्याचा उपयोग घेतला जात नाही. केवळ एक कर्मचारी संपूर्ण कार्यालय सांभाळतो. टेलिफोनची बिलेही याठिकाणी स्वीकारली जात नाही. याकामासाठी दारव्हा गाठावे लागते.
यासंदर्भात विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता श्रीकांत तळेगावकर म्हणाले, वीज बिलाचा भरणा करण्यासाठी बीएसएनएलला वारंवार सूचना दिल्या. नाईलाजाने वीज पुरवठा खंडित करावा लागला.

गेल्या तीन दिवसांपासून बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प होत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
- विशाल कांबळे, व्यवस्थापक
बँक आॅफ महाराष्टÑ, नेर

Web Title: India broke the power of communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.