भारत देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

By Admin | Published: April 11, 2016 02:35 AM2016-04-11T02:35:40+5:302016-04-11T02:35:40+5:30

सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही.

India is on the threshold of anarchy | भारत देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

भारत देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

googlenewsNext

रावसाहेब कसबे : समता पर्वात मार्गदर्शन, चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
यवतमाळ : सद्यस्थितीत आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो कधी कोलमडून पडेल हे काहीही सांगता येणार नाही. ‘मनुस्मृती’ आणि ‘भगवद् गीता’ या जुळ्या बहिणी आहेत. समाजात दुही माजविणाऱ्या या ग्रंथांना कदापि राष्ट्रीय ग्रंथाचा मान देता येणार नाही, असे विचार डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे मांडले.
समता प्रतिष्ठान यवतमाळच्या विद्यमाने समता मैदानात आयोजित महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात ते बोलत होते. यावेळी समता मंचावर ‘एक क्षण गौरवाचा’ या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. अशोक पळवेकर होते. अतिथी म्हणून समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखडे, सचिव अनिल रामजी आडे, मार्गदर्शक दीपक नगराळे, प्राचार्य आनंद ठमके, अ‍ॅड. दिंडीलता कांबळे, अ‍ॅड. मिलिंद भगत, प्रा. बाळकृष्ण सरकटे, लॉर्ड बुद्धाचे के.एस. नाईक आदी उपस्थित होते.
इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून हा देश कसा जगला हे नमूद करताना डॉ. कसबे म्हणाले, आर्य, हुन, फ्रेंच, तुर्की, ब्रिटिश देशात आले. त्यांचे आपण स्वागतच केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भारताचा इतिहास पारतंत्र्याचा, पराजयाचा, अपमानाचा इतिहास आहे. जोपर्यंत जात नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश राष्ट्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. बाबासाहेब हे जगातील सर्व शोषित समुहाचे नेते झाले आहेत. त्यांना हे जग कसे घडवायचे होते हे सत्य अधोरेखित करण्याची १२५ वी जयंती हाच योग्य मुहूर्त असल्याचे ते म्हणाले.
डॉ. अशोक पळवेकर यांनी, सामाजिक नीतीचा धम्म अस्तित्वात येण्यासाठी डॉ. कसबे यांचे विचार-मांडणी पुढे नेण्याची भूमिका चळवळीला अदा करावी लागेल, असे मत व्यक्त केले. प्रारंभी निशा तिरपुडे हिने नृत्य सादर केले. यानंतर शेखर वांढरे यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कथाकार हेमंत थोरात यांच्या ‘इत्यर्थ’ व प्रा. सिद्धार्थ भगत यांच्या ‘कळ कोवळी उठू दे’ गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रा. अंकुश वाकडे, परिचय एन.यू. धांदे यांनी, तर आभार सिद्धार्थ मानकर यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: India is on the threshold of anarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.