मारेगावात देशी दारूचे भाव वधारले, मद्यपींची वरिष्ठांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:18+5:302021-07-30T04:44:18+5:30
देशी दारू जीवनावश्यक गरज नसली तरी ती अनेकांची आज गरज बनली आहे. त्यामुळे तर काही लोकांचे भोजनापेक्षा दारूवर जास्त ...
देशी दारू जीवनावश्यक गरज नसली तरी ती अनेकांची आज गरज बनली आहे. त्यामुळे तर काही लोकांचे भोजनापेक्षा दारूवर जास्त प्रेम असल्याचे बघालय मिळते. राकेश, रूपेश, भिंगरी, अमर, गोवा, बॉबी आदी नावाने ही देशी दारू मद्यपींमध्ये लोकप्रिय आहे. देशी दारूमध्ये सर्वाधिक खप १८० एम.एल.चा पव्वा व टिल्लू नावाने ओळखल्या जाणाऱ्या ९० एम.एलच्या दारूचा आहे. सामान्याच्या आवाक्यात देशी दारूचे दर राहावे म्हणून देशी दारूवर राज्य शासनाचे नियंत्रण आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही यावर नियत्रंण आहे. राज्य उत्पादन विभाग दारूचे दर निश्चित करते. दारूचे दर निश्चित करीत असताना सर्व करासहित ही दारू किती रुपयाला विकायला पाहिजे, हे बॉटलवर लिहिलले असते. असे असताना लॉकडाऊनच्या काळापासून मारेगावात दारू दुकान चालकांकडून दारूच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने दारू विक्री करून आर्थिक लूट करीत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे. याबाबत दुकानदार चालकाला विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. आता यावर काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.