आमणी येथे साथ रोगाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:34 PM2018-09-18T22:34:21+5:302018-09-18T22:34:44+5:30
तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. साथरोग मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा प्राथमिक आरोग्य केन्द्र म्हसोला येथिल संबधीत अधीकारी कर्मचारी मात्र गावात फीरकलेच नाही.
आरोग्य यंत्रणा लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधीकारी कार्यालयात केली. या तक्रारीतून गावात ताडीने आरोग्य कॅम्प लावण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. आर्णी तालुका मुख्यालयापासून अगदी आठ किमलोमीटर अतंराव आमणी हे गाव आहे. या गावात दीडशे कुटूंब असून बहुतांश शेतकरी,शेतमजुर आहेत. गट ग्रामपंचायत असल्याने या गावाकडे प्रशासनाचे लक्ष नाही असाही आरोप गावकºयांचाआहे. गावातील सत्तर ते अंशी टक्के लोक या साथ रोगाने आजारी पडले आहेत.
गावात संबधीत विभागाने स्वच्छता अभियान हाथी घेण्याची गरज आहे. तथा आरोग्य कर्मचाºयांनी ताबडतोब घरोघरी जावून तपासनी करुन औषधोऊपचार करण्याची गरज आहे.आरोग्य विभागाच्या अधीकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच ह्या गावात साथरोग वाढल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. निवेदनावर आमनी गावातील पोलीस पाटील संदीप पवार ,ग्रामपंचायत सदस्य सिमा गितेश चव्हाण,सुभाष चव्हाण,सुभाष रुणवाल,जगलाल चव्हाण,विठ्ठल राठोड,सदाशिव चव्हाण,गितेष चव्हाण यांच्या स्वक्षºया आहेत.