जिल्ह्यात साथीच्या तापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:25+5:30
महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सततच्या ढगाळी वातावरणामुळे साथीच्या तापाची लागण होत आहे. प्रत्येक घरात तापाचे रुग्ण आढळत आहे. सुदैवाने यावर्षी डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरिया सारख्या घातक आजारांचा आतापर्यंत उद्रेक झाला नाही. मात्र सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण दिवसेन्दिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय औषधशास्त्र विभागात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या ही ७०० च्या घरात पोहोचली आहे. यापैकी ५० रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.
साधारणत: जुलै महिन्यानंतर आजाराचे प्रमाण वाढण्यास सुरूवात होते. यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातही पाऊस मोजकाच पडला. त्यामुळे डबके साचून, पुराचे पाणी शिरून जलस्त्रोत दूषित झाले नाही. परिणामी साथीच्या आजाराचा कुठे उद्रेक झाला नाही. ही बाब जिल्हावासीयांसाठी सुखद असली, तरी आता साथीच्या तापाने डोके वर काढले आहे. या तापाचा झपाट्याने फैलाव होत आहे. महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.
६८ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा
विविध तालुक्यात फवारणीतून विषबाधा होणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ६८ शेतकºयांना विषबाधा झाली आहे. यापैकी ४४ शेतकºयांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर चार शेतकरी अर्धवट उपचार सोडून रुग्णालयातून पळून गेले. अजूनही २० शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. ढगाळ वातारवणामुळे सोयाबीन व कापूस पिकावर अळ्याचा मोठा प्रार्दुभाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकºयांना फवारणी करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच विषबाधा होण्याच्या घटना घडत आहे. कृषी यंत्रणा जनजागृती करत असली तरी विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
व्हायरल फिव्हर म्हणजे साथीचा ताप. या तापाचे रुग्ण काही आठवड्यापासून वाढले आहे. सर्दी, खोकला व घश्यात संसर्गाचे रुग्ण येत आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावा व योग्य खबरदारी बाळगावी. - डॉ. बाबा येलके,
विभाग प्रमुख, औषधीशास्त्र विभाग