यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 04:35 PM2018-03-22T16:35:24+5:302018-03-22T16:50:01+5:30

नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.

Injured in elephant attack in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

Next
ठळक मुद्देराळेगाव तालुक्यातील घटनानरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेला हत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. जखमी मजुराला यवतमाळच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुभाष ललित पोटे (४५) रा. खडकी सुकळी असे जखमीचे नाव आहे. राळेगाव तालुक्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला. १२ जणांचे बळी घेतले. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने मध्यप्रदेशातून एका हत्तीला पाचारण करण्यात आले. या हत्तीवरून शोध मोहीम घेतली जात आहे. बुधवारी रात्री शोधमोहीम संपल्यानंतर या हत्तीला लोणी येथील वनचौकीत बांधून ठेवले होते. रात्री हा हत्ती साखळी सुटल्याने शेतशिवारात भटकला. गुरु वारी सकाळी सुभाष पोटे पत्नीसह झाडगाव येथे अंत्ययात्रेसाठी जात होता. झाडगाव-पिंपळखुटी शिवारात या हत्तीने अचानक सुभाषला सोंडेने वर उचलले आणि जमिनीवर आदळले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. दरम्यान परिसरातील नागरिक तेथे धावून आले. हत्तीला हुसकावून लावत जखमी सुभाषला राळेगावच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून हत्तीला माहुताच्या मदतीने जेरबंद करून सावंगी येथील वन चौकीवर आणले. येथे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची तपासणी करण्यात आली. हत्ती सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेतशिवारात फिरताना हत्तीला विजेचा धक्का लागल्याने तो गोंधळला आणि समोर दिसलेल्या सुभाषवर हल्ला केल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Injured in elephant attack in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ