नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:09+5:302021-09-18T04:45:09+5:30

राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी मागील ...

Injustice on farmers who repay regular loans | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय

Next

राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे कर्जाची उचल करून त्याची परतफेड केली, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती; परंतु आजतागायत अजूनही शेतकऱ्यांना ती रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे. पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतकरी व्याजाने पैसे घेऊन दिलेल्या वेळेत कर्जाचा भरणा करून उचललेल्या कर्जाची परतफेड करीत होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या घरातील किमती वस्तू, काही शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्जाचा भरणा केला. ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यास महाविकास आघाडी विलंब करीत आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी रोष निर्माण झाला आहे.

Web Title: Injustice on farmers who repay regular loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.