निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय
By admin | Published: November 29, 2015 03:11 AM2015-11-29T03:11:58+5:302015-11-29T03:11:58+5:30
देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.
चंद्रशेखर यादव : भारतीय पिछडा शोषित संघटनेची पत्रकार परिषद
यवतमाळ : देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे घडले नाही. सरकारची त्या दृष्टीने काम करण्याची इच्छा नाही. यामुळे ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा दिला तरच आरक्षणानुसार निधी मिळेल, असे मत भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ओबीसींचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना ओबीसींची संख्या सांगणे धोक्याचे वाटत आहे. खुर्ची जाण्याचा धोका त्यांना वाटतो. यामुळे ओबीसींच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार संघ चालवित आहे. भाजपा आणि मोदी संघाचा मुखवटा असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सामाजिक जागृती आहे. मात्र राजकीय जागृती नसल्याचे ते म्हणाले. बुद्धीजीवी लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला रमेश पिसे, अनिल घुसे, दीपक वाघ, गुणवंत गणवीर, विलास काळे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)