एसीसी कंपनीकडून कामगारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:40 PM2019-06-10T21:40:27+5:302019-06-10T21:40:39+5:30

तालुक्यातील शिंदोला येथील एसीसी या सिमेंट उत्पादक कंपनीकडून कामगारांवर तसेच परिसरातील गावांवर अन्याय होत असल्याने सोमवारी कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिरपूर पोलिसांना १५ ते २० आंदोलकांना स्थानबद्ध केले.

Injustice to workers from ACC company | एसीसी कंपनीकडून कामगारांवर अन्याय

एसीसी कंपनीकडून कामगारांवर अन्याय

Next
ठळक मुद्देकामगारांचे आंदोलन : आंदोलक स्थानबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील शिंदोला येथील एसीसी या सिमेंट उत्पादक कंपनीकडून कामगारांवर तसेच परिसरातील गावांवर अन्याय होत असल्याने सोमवारी कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिरपूर पोलिसांना १५ ते २० आंदोलकांना स्थानबद्ध केले.
एसीसी कंपनीमध्ये पीआरपी ही खासगी कंपनी खाणीतून फॅक्टरीपर्यंत कच्चा माल पोहोचविण्याचे काम करते. या कंपनीने स्थानिक १३ वाहनचालकांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे चालक-कामगार संघटनेने निवेदन देऊन चालकांना पुन्हा कामावर घेण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे गोवारी, पार्डी, शिंदोला, येनक, चनाखा या गावात मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली. याबाबत संघटना व गावकऱ्यांनी एसीसी कंपनीसोबत चर्चाही केली. त्यावेळी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले होते. त्यामुळे चालक कामगार संघटनेने व गावकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगीत केले होते. परंतु ते आश्वासन पूर्ण केले नाही. उलट कंपनीच्या अधिकाºयांकडून अरेरावीची भाषा कामगारांसोबत सुरू झाली.
त्यामुळे सोमवारी संतप्त झालेल्या कामगार संघटना व परिसरातील गावकºयांनी शिंदोला मार्गावर संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन शिरपूर पोलिसांनी लोकेश बोबडे, विठ्ठल बोंडे, भगवान मोहिते, राजू इद्दे, लतिफ खान, संतोष कुचनकर, महेश कुचनकर, सचिन तुराणकर, राजू कुमरे यांच्यासह आंदोलकांना स्थानबद्ध केले.

Web Title: Injustice to workers from ACC company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.